#नवदुर्गा
Автор: Shekhar Chhatre
Загружено: 2025-09-28
Просмотров: 63
#अभ्युदयवार्ता
#नवदुर्गा
वेगळया अनवट वाटा ...
कोविड महामारीच्या काळात लोक घराबाहेर पडायला सुद्धा घाबरत होते.तेव्हा वीस वर्षाची एक युवती केईएम रुग्णालयातून इंटर्नशिप करत असताना शवविच्छेदन करून त्याचे रिपोर्ट्स वरिष्ठांना सादर करीत होती. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल साठ शवांचं विच्छेदन तिनं या काळात केलं.तसेच त्यावेळी शिकत असलेल्या एम.बी.बी.एस. आणि बी एम एस च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण केलं.
अर्थात तिच्या या कार्याचा यथोचित सन्मान रुग्णालय प्रशासनाने केला होता.
फॉरेन्सिक सायन्स सारखं वेगळं आव्हानात्मक करियर निवडून आंबेवाडी मध्ये राहणाऱ्या भूमिका संतोष वाघमारे हिने धाडसाची आणि बुद्धिमत्तेची चुणूक जगाला दाखवून दिली
इथल्याच अभ्युदय एज्युकेशन शाळेत शिकून पुढे इन्स्टिट्युट ऑफ फॉरेन्सिक सायन्स या फोर्ट येथील नामांकित महाविद्यालयातून या विषयात बी एस्सी करत आहे.पुढे ह्याच विषयात पी एच डी करून परदेशात विशेष उच्चशिक्षण घेण्याचा तिचा. मानस आहे.
फॉरेन्सिक सायन्स आता खूप विकसित झाले आहे.गुन्हेगारी विश्वातील अनेक रहस्यं या तंत्रज्ञानामुळे उलगडली जात आहेत.पोलिसांना खून,आत्महत्या,गुन्हे यांचा उलगडा करण्यासाठी गुन्हा साबित करण्यासाठी या शाखेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
अगदी पशू पक्षी, ड्रग्ज,एवढेच नाही तर सायबर गुन्ह्यातही फॉरेन्सिक मदतीला येतं.
भूमिका ने यासाठी कायदा, पदार्थ विज्ञान, रसायन शास्त्र,जीवशास्त्र यात अभ्यास केला असून केवळ हस्ताक्षरावरून . स्वाक्षरीवरून आरोपी पकडला जातो. हाडांच्या नमुन्यावरून वय आणि लिंग निदान ती करू शकते.
हे सगळं झालं तिच्या करियर बाबत...या शिवाय ती गिटार पण शिकत आहे.भारतीय आणि पाश्चात्य नृत्याचा पण ती रियाझ करत असते.
आई वडील आणि मोठी बहीण ऍड.प्रथा वाघमारे हीचा भूमिकेच्या यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा आहे असं ती अभिमानाने सांगते
आणि म्हणूनच आजची खास पाहुणी आहे
भूमिका संतोष वाघमारे
भूमिका...
पुढील प्रकाशमय वाटचालीसाठी अभ्युदयवार्ता कडून अभिनंदन आणि शुभेच्छा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: