#Abhanga
Автор: Bhakti Yog
Загружено: 2021-04-09
Просмотров: 65884
जपत जाय नाम 🌷 Japat Jaya Naam Me
चोख आणि खऱ्या परमार्थामध्ये
नाम म्हणजे काय ?
तर मी व नामी यांना जोडणारा पूल म्हणजे नाम. ही वाट चढताना जीवाची वेळोवेळा घसरण होते . कारण मनाच्या या विलक्षण पसार्यात मन कधी गुंतून जातं हे मनाला समजत नाही कारण ईश्वराला अप्रिय आहे तो फक्त अहंकार.
मी व ईश्वर यात अडथळा म्हणजे हाच मीपणा.
"अहंकार गेला तुका म्हणे देव झाला" या संतउक्तीप्रमाणे अहंकाराचा समूळ नायनाट व्हायला हवा .
जसे ताकामध्ये लोणी सुप्त अवस्थेत असतेच पण ताकाची घुसळण झाल्यावर हळूहळू लोण्याचे पसरलेले कण दिसू लागतात आणि हळूहळू या लोण्याचा एक गोळा तयार होतो तसेच जाणीवेमध्ये आनंद मुळातच आहे .
पण नामरूपी रवीने त्याची घुसळण केली , त्याचे मंथन केले की अफाट पसरलेला आनंद एकाच ठिकाणी येतो ज्याला आपण भक्तिमार्गामध्ये स्वानंद म्हणतो .
एकत्वाशी आपण एकरूप होतो . मन हे मन राहतच नाही मनाला नामाची साथ मिळते आणि ह्या दोघांच्या मीलनातून उदयाला येते ते "उन्मन" ह्या उन्मनी अवस्थेत ईश्वराच्या स्वरूपाची प्रचिती साधकाला येते .
साक्षात्कार साक्षात्कार म्हणतात तो हाच......
या अवस्थेत साधक इतका शांत होतो की जसे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ........
" ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरुनी श्रीहरी जपे सदा "
अशी एक मौन अवस्था जिथे नामजप करण्याची साधकाला गरज नाही तर ते काम स्वतः ईश्वराकडूनच होते.
जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा असे म्हटले आहे अश्या दिव्य गुणांनी नटलेल्या त्रिभुवनाला रंग देणारा रंगारी परमेश्वरा तुझं सगुण रूप म्हणजेच तुझा अनुभव मला दे जेथे मीपणाचा अडथळा होतो तो मीपणा जाऊदे जळू दे ...आणि "जिथे उठे मी चे स्फुरण तीथे घडावे विठ्ठल स्मरण " अशी मी तुझ्याकडे पांडुरंगा विनवणी करतो .
शब्दांकन
मंदारमाला बांदकर (धुरी)
Song , music composition , lyrics and Video by Pravin Bandkar
For More Upcoming 'Abhanga' and 'Yog Geet' SUBSCRIBE now and tap bell icon 🔔
Follow us on 'Bhakti Yog' Facebook -
/ bhakti-yog-102532825270667
Artists
Lyrics - Pravin Bandkar
Singer - Pt. Sanjeev Abhyankar
Music Composition - Pravin Bandkar.
Tabla - Ajinkya Joshi
Pakhwaj - Omkar Dalvi
Side Rhythm - Apurv Dravid
Harmonium - Abhinay Ravande
Video - Ashok Shelar
Sound - Omkar Kelkar
Produced by Pravin Bandkar.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: