महाराष्ट्रात नाशिक–सोलापूर–अक्कलकोट सहापदरी ग्रीनफील्ड मार्गिकेला मंजुरी
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2025-12-31
Просмотров: 2039
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांसंदर्भातील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत महाराष्ट्रात सहापदरी ग्रीनफील्ड प्रवेश-नियंत्रित नाशिक–सोलापूर–अक्कलकोट मार्गिका बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
बीओटी (टोल) पद्धतीवर आधारित या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची एकूण लांबी 374 किमी असून, एकूण भांडवली खर्च अंदाजे ₹19,142 कोटी आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर यांसारख्या प्रादेशिक शहरांना अधिक सुकर कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे तसेच आंध्रप्रदेशातील कुर्नूलपर्यंत जोडणी मजबूत करेल.
हा प्रकल्प पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याअंतर्गत वाहतूक पायाभूत सुविधांच्या एकात्मिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
🔹 251 लाख मनुष्यदिवस प्रत्यक्ष रोजगार
🔹 313 लाख मनुष्यदिवस अप्रत्यक्ष रोजगार
🔹 राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांशी सशक्त जोडणी
या मार्गिकेमुळे प्रदेशातील विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
#NashikSolapurCorridor #GreenfieldHighway #PMGatiShakti #InfrastructureIndia #MaharashtraProjects #HighwayDevelopment #AshwiniVaishnaw #IndianCabinet
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: