v34.हालकीवर काढल्या सात घाया. आधी Description मधील माहिती वाचा. मगच vdo पाहणे बरे राहिल.
Автор: रिदम (मध्य मराठवाडा)
Загружено: 2023-07-07
Просмотров: 56647
प्रत्येक चर्म वाद्य जसे तबला, ढोलकी यांना स्वत:चे ताल आहेत. व या तालाला शास्त्रीय नावे आहेत. जसे भूप ताल. तसेच हालकी या चर्म वाद्यातून जे ताल काढले जातात, त्या तालाना नावे आहेत परन्तु इतर वाद्याना शास्त्रीय नावे आहेत तशी नाहीत. तर ज्या देवापुढे जो ताल काढला जातो, त्या तालाला त्या देवाचे नाव देवून पुढे घाई असे नाव दिलेले आहे. उदा. महादेवाची घाई, खंडोबाची घाई. या वरुन असे स्पष्ट होत आहे की, हालकिच्या तालाला ताल न म्हणता घाई असे म्हणतात.
वरील vdo त सात घाया काढुन दाखविल्या आहेत.
1. महादेवाची घाई
2.खंडोबाची घाई
3.रुमाली धुल्याची घाई (रुमाल हवेत फिरवित नाचायचा जो नाच असतो ती घाई)
4.रमत्या डोल्याची घाई (पळक्या...पण घाई वेगळी असते)
5.महमादानि घाई
6.घोडे नाचाची घाई (कपटाचे दोन घोडे असतात)
7.वाट घाई (देवी देवतांना निवद पूजायला जाताना हालकीवर काढतात ती घाई)
आशा पुष्कळ देवांच्या घाया हालकी वाद्काना अवगत असतात. आज इथे फक्त सात घाया दाखविण्यात आल्या आहेत. या पुढे इतर घाया मिळवून या चानल वर लोड करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
कलाकार :
पोतराज (गायक): संभाजी लक्ष्मन देवकते
सनई वादक व
संगीत संयोजक : मुरलीधर रामराव जावीर
सुर वादक : वारू मलबा टाळकुटे
हालकी वादक1 : मंचक शेषराव होलबले
हालकी वादक2 : रावसाहेब जळबा होलबले
संकल्पना : एम. आर. भालेराव
सुत्रसंचालक व
ऑर्गनायजर : शा. गोपाळ गोविंद एंगडे
(सचिव: जनजागृती कला
पथक खडी,
ता.पालम जी.परभणी)
आणखी पोतराज ओव्या व आराधिन गानी या चानल वर आहेत.
पहायची ऐकायची असतील तर कशी शोधायची?
तर खाली काही स्टेप दिल्या आहेत. त्या स्टेप बाय स्टेप तूम्ही क्लिक करीत पुढी जात राहिलात की आमचे सर्व vdo तुम्हाला भेटतील.
स्टेप: तुमच्या मोबाईल वर you tub उघडा. .. वरच्या बाजुला बहिर्गोल भिन्गाचे चित्र दिसेल..त्यावर क्लिक करा..त्यावर मराठीत..रिदम (मध्य मराठवाडा) अगदी असेच कंसा सह टाईप करा. त्या अक्षरावरच क्लिक करा.. काही चानल येतील..त्यात एका गोलात ढोलकी पेटीचे चित्र व कला हेच जिवन, असे लिहिलेले दिसेल..त्या गोलावरच क्लिक करा..आमचे सर्व vdo दिसतील. हे सर्व vdo एकाहून एक मनोरंजक व उदबोधक आहेत..आपण त्याचा आनंद घेऊ शकता. असे आनंददायक vdo दुस-या लोकायला जरुर जरुर पाठऊन द्या.
या पुढे आणखी vdo चानल वर टाकण्यात येणार आहेत. तुम्हाला असे कार्यक्रम आवडत असल्यास, ताबडतोब तुमच्या मोबाईलवर हे vdo येण्यासाठी या चानलला subscribe करुन ठेवा.
like नाही केले तरी चालेल, कॉमेंट नाही केल्या तरी चालतील, पण तुम्हाला आवडलेले vdo इतराना नक्की share करा (दुस-याना पाठवा), म्हणजे या कला कृतीचा दुस-यानाही आनंद घेता येईल.
धन्यवाद 🙏🏻
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: