सगुणा आज्जी - एक आठवण ! | In memories of Saguna Aaji |
Автор: NishantAwadeVlogs
Загружено: 2026-01-10
Просмотров: 7943
🌸सगुणा आजी – एक मायेचं पान 🌸
सगुणा नाव, पण माया त्याहून गहिरी,
साऱ्या गुणांचं मूर्त रूप, ज्यांचं प्रेम अगदी शुद्ध आणि अखंड होतं.
या माऊलीसाठी खूप काही करायच्या गोष्टी आज अर्धवट राहिल्या, याची खंत आता आयुष्यभर मनात कायम राहिल,
लवकरच त्यांचे डोळ्यांचे अॅापरेशन पुण्यातील नामवंत जहांगीर रुग्णालयात करायचे नियोजित होते आणि ते होताच घराची डागडुजी करायची हे देखील ठरले होते परंतू काळाच्या मनात काही वेगळेच होते,
प्रदीर्घ आजारामुळे, आज आजींची प्राणज्योत मालवली आणि त्यांनी आज दिनांक ०८/०१/२०२६ रोजी सायंकाळी वेल्हे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला.
सगुणा आजी,
आज तुम्ही गेलात – पण आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही,
तुमचं प्रेम, तुमचे शब्द, आणि तुमचे संस्कार आम्हाला पुढे नेतील, नेहमी प्रेरणा देत राहतील, तुमचं तोरणगडाच्या रहाळातील ज्वलंत अस्तित्व आमच्या प्रत्येकाच्या ह्रदयात सदैव जिवंत राहील..🥺
भावपूर्ण श्रद्धांजली प्रिय सगुणा आजी…💐🙏🏼🙏🏼🙏🏼
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: