एकविरा आईची रहस्यमय कथा
Автор: Pooja K Creative Videos
Загружено: 2025-04-02
Просмотров: 154429
एकविरा आईची रहस्यमय कथा #ekvira #karla #lonavala | unknown facts about Ekvira devi #ekviratemple
नमस्कार मी पूजा नरेंद्र मढवी आज मी तुम्हाला एकविरा आई कर्ल्याला जाण्या अगोदर कुठे रहात होती ? व ती कर्ल्याच्या डोंगरावर का गेली तसेच कर्ल्याच्या डोंगरावर एकविरा आईचे मंदिर कोणी बांधले आणि चैत्र मासात एकविरा आईची मानाची पालखी येते तरी कुठून याची माहिती मी या व्हिडिओ मधून तुम्हाला देणार आहे.
आई एकविरा ही आग्री कोळी लोकांचे कुलदैवत आहे. आई एकविरा माऊलीची कृपा ही दर्या किनारी असणाऱ्या आग्री कोळी बांधवांवर जास्त आहे. कारण या दोन्ही समाजाचा सागरावर उदर निर्वाह असतो. जसे की आम्ही आग्री समाजाचे आहोत. आग्री लोकांचे आगारखाने म्हणजेच मिठाग्रे असायचे तसेच नारळ सुपारीच्या बागायत व मासेमारी हे प्रमुख व्यवसाय व कोळी बांधवांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय. होड्या पाण्यात सोडताना प्रवास सुखकर होवून सुखरूप किनाऱ्याला येण्यासाठी आई एकविरा माऊलीला साकड घालून प्रवास करण्याची प्रथा आहे. आग्री कोळी समाजाची जशी कुलस्वामिनी आई एकविरा माता आहे. तसेच महाराष्ट्रातील विशेषत: मुंबई, ठाणे, रायगड, कोकण, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राम्हण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकविरा देवी कुलस्वामिनी असून श्रद्धास्थानही आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा आईची ख्याती आहे. एकविरा आई कार्ल्याला जाण्याअगोदर चौल आग्राव येथे राहत होती. चौलला शितळादेवी, चंपावती, महाकाली, कृष्णाई, महालक्ष्मी, मरू आई आणि एकविरा आई अश्या या सात बहिणी होत्या. आई एकविरा ही त्यांची सर्वात धाकटी बहिण होती. म्हणून तीला मान पान कमी होता. या कारणामुळे आई एकविरा देवीने तिची मोठी बहीण म्हणजेच शीतळा देवीला असे विचारले की, तुम्हा सर्वांचा मान पान जास्त होतो आणि माझ्याकडे भक्तगण कमी का येतात. मला सुद्धा मान पान भेटावा यासाठी मी काय करू ? तेव्हा शीतळा देवी आईने मोठी बहीण या नात्याने आपल्या धाकट्या बहिणीला म्हणजेच एकविरा देवीला असे सांगितले तुला सुद्धा मान पान पाहिजे असेल आणि भक्तगण तुझ्याकडे दर्शनाला यायला पाहिजे असतील तर तू हे गाव सोडून दूर जा म्हणजेच तुझे भक्तगण तुला भेटायला येतील व तुला मोठा मान भेटेल म्हणून आई एकविरा देवी आग्राव गाव सोडून गेली. म्हणून आग्रावला एकविरा आई चे माहेरघर म्हणतात.
आता मी तुम्हाला आई एकविरा देवी आग्राव गाव सोडून गेल्यावर कार्ल्या डोंगरावर तिचे मंदिर कोणी बांधले याची थोडक्यात कथा सांगते.
कार्ल्याच्या एकविरा देवीच्या मंदिराचा इतिहास
पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पण एका रात्रीत मंदिर बांधणे शक्य नव्हते त्यामुळे पांडवांनी तपस्या करून सात रात्रींची एक रात्र करून पांडवांनीही हे मंदिर बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही,असा वरही तिने पांडवांना दिला. एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.
चैत्र मासात एकविरा आईच्या मानाच्या पालखीचा मान हा एकविरा आई चे माहेर घर असलेल्या चौल आग्रावकरांचा असतो. कारण आग्राव हे एकविरा आई चे माहेरघर आहे. जसे भक्त एकविरा आईचे दर्शन घ्यायला आतूर झालेले असतात तशीच आई एकविरा देवी पण भक्तांची वाट पाहत असते. कार्ल्याच्या डोंगरावर एकविरा आई व तांबडी जोगेश्वरी माता म्हणजेच दोन्ही नणंद भावजय सोबत आहेत. एकविरा आईचा भाऊ काळभैरव हे आहेत. दर वर्षी चैत्र पौर्णिमेला काळभैरव नाथांची पालखी निघते आईचा भाऊ जेव्हा जातो तेव्हाच आई दरवाजा उघडते. गुढपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी शिडाच्या होड्यांची शर्यत चौल आग्राव येथे असते. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहा सात होड्या असतात. एकविरा देवीची पालखी घेवून जाणारी मानाची एक होडी यात असते. बघायला आलेल्या शंभर पेक्षा जास्त होड्या आणि हजारो माणसांनी हा समुद्र भरून जातो. म्हणजे अक्षरश:हा पाण्यातल्या जत्रेचा अनुभव येतो. राजलक्ष्मी, हिरावती, पद्मावती, धनलक्ष्मी या सारख्या नावाच्या होड्या पाण्यात उतरवल्या जातात आणि एका धमाक्यानिशी ह्या होड्यांचे शीर उघडून स्पर्धा सुरू होते. त्याच होडीतील पालखी घेवून हे आग्रावचे कोळी बांधव पदयात्रा करीत चौल आग्राव ते कार्ला येथे एकविरा आई ज्या वाटेने गेली होती त्या वाटेने हे कोळी बांधव एकविरा आईची पालखी घेवून कार्ला डोंगरावर जातात. चैत्र सप्तमीला चौल आग्रावच्या या पालखीला पहिला मान असतो. त्याच प्रमाणे चैत्र अष्टमीला एकविरा आईचे तेलवण पहाटे होते. त्या तेलवणात देखील चौल आग्राव येथील कोळी महिला पहिला तेलवण करतात आणि मगच अष्टागरातील जे कोळीवाडे आहेत अष्टागर म्हणजे अलिबाग, मुंबई भागातील लोकांना एकविरा आईच तेलवण करायला देतात अशी ही प्रथा आहे.
आई एकविरा माते की जय 🙏🏻
श्री शीतळा देवी माता चौल दर्शन व कथा
👇
• श्री शितळा देवी मंदिर चौल दर्शन व कथा | Sh...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: