Khamgaon Gajanan Maharaj: अचानक खामगावमध्ये प्रकटलेल्या गजानन महाराजांचं सत्य काय, विश्वास का बसला?
Автор: BolBhidu
Загружено: 2023-10-03
Просмотров: 306522
#BolBhidu #Khamgaon #gajananmaharajbavani
सध्या सगळ्या महराष्ट्रात चर्चेतआहे, बुलढाण्याच्या खामगावमधली एक बातमी. बातमी काय होती, तर खामगावात गजानन महाराज प्रकटले, दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी. आता नेमकं झालं काय होतं ? तर खामगावच्या सुटाळपुरामध्ये रविवारी संध्याकाळी सात-आठच्या सुमारास एक व्यक्ती अचानक आली, तेही संत गजानन महाराजांच्या वेशभुषेत. सुटाळपुरामध्ये अशोक सातव नावाचे एक गृहस्थ आहेत, त्यांच्या घरी गजानन महाराजांच्या वेषभुषेतली एक व्यक्ती आली, मला तुमच्या घरी जेवायचं आहे, अशी विनंती या व्यक्तीनं सातव यांच्याकडे केली.
त्याआधी दुपारी ही व्यक्ती खामगावच्या गजानन महाराजांच्या मंदिराबाहेरही एका भक्ताला दिसली होती, पण या व्यक्तीनं त्या भक्ताशी संवाद साधला नाही. सातव यांनीही त्या व्यक्तीला घरात बोलावलं, जेवायला बसवलं. या व्यक्तीला सातव यांच्या घरी जेवताना शेजारच्या माणसानं पाहिलं आणि गजानन महाराजांसारखीच वेषभूषा, बसण्याची पद्धत असल्यानं सातवांकडे गजानन महाराज प्रकटले, ही बातमी अक्ख्या खामगावात पसरली. पण या व्यक्तीचं सत्य काय होतं ? लोकांचा हेच गजानन महाराज असल्यावर विश्वास का बसला ?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: