श्री संतोष पाटील | नर्सिंगपूर | उशिरा लागण | कृषिरत्न डॉ संजीव माने
Автор: Oos Sanjeevani Sugarcane
Загружено: 2024-04-09
Просмотров: 28136
मुलाखत क्रमांक 93
#यशस्वी #वाटचाल #ध्यास #उत्पादनवाढीचा
योग्य मार्गदर्शन व त्याला स्व-कष्टाची जोड.
https://fb.watch/rj7WFz02qs/?mibextid...
नाव - श्री संतोष पाटील
गाव- नर्सिंगपुर, ता. - वाळवा.
क्षेत्र - 3 एकर
जमीन प्रकार - खोल काळी जमीन
उसाची जात - को 86032
सरिमधील अंतर - साडे चार फुट.
लागण - एक फूट
लागण दि.- 1 ऑगस्ट 2023
खतांची मात्रा - ऊस संजीवनी चार्ट प्रमाणे.
पाणी - तोटी सिस्टीम
मशागत - 2 वेळा उभी आडवी नांगरट, रोटार
सेंद्रिय - प्रेस्मड 12 टेलर, स्पेंट वाश, पाचट कुजवले (3 एकर)
खत मात्रा - संजीव माने ॲप प्रमाणे
फवारणी - ऊस संजीवनी 4 फवारणी
आळवणी - ब्लॅक कीट आणि सॉईल पॉवर जीवाणू दोन वेळा
नमस्कार,
मी संतोष पाटील, राहणार नर्सिंगपुर, कृषिभूषण डॉ. संजीव माने हे माझे जवळचे नातेवाईक आहेत, आमचा संपर्क तसा आधीपासून होताच, घरगुती कार्यक्रमात कायम भेट व्हायची, मी प्रामुख्याने नोकरी करत असल्याने शेत कडे फारसे पाहत न्हवतो, घरची शेती अधिक असून देखील पारंपरिक पद्धतीने करत असल्याने सगळ्या शेतात मिळून कधी 150 टनाच्या पुढे एकूण ऊस कारखान्याला जायचा नाही, वडलांच्या पशच्यात मी शेती पाहू लागलो, शास्त्रोक्त शेती करावी असे सतत माझ्या मनात यायचे, पण नोकरी पाहत पारंपरिक शेती सोपी वाटायची, कारण त्यात फार कष्ट न्हवते, एकदा संजीव दादांशी एका कार्यक्रमात भेटलो शेतीची चर्चा करत असताना त्यांनी उसाची माहिती अती सोप्या भाषेत मला सांगितली आणि त्यांनी त्यांचे सहकारी बाळासाहेब गुरव यांची ओळख करून दिली, बाळासाहेब हे नवेखेड म्हणजे नर्सिंगपुर पासून अगदी 7-8 किलोमीटर वर राहतात, कधी काही लागले तर यांना संपर्क करा, ते सर्व नियोजन तुम्हाला करून देतील; असे संजीव दादांनी मला सांगितले आणि त्या क्षणापासून आमचा विक्रमी उत्पादन वाढीचा प्रवास सुरू झाला असे मला वाटते, जमिनीची सुपीकता, लगणीची पद्धत, संख्याशास्त्र, खताच्या मात्रा, आळवणी, फवारणी, या सगळ्यांचे वेळेवर नियोजन का करावे हे सगळे मी समजावून घेतले, यू ट्यूब वर संजीव दादांची बरीच व्याख्याने आहेत, ती पहिली शिवाय बाळासाहेब मार्गदर्शन करतच होते, मागील हंगामात देखील संजीव दादांच्या मार्गदर्शना खाली मला खूप चांगले ऊस उत्पादन मिळाले, या हंगामात देखील मी चांगला प्रयत्न करत आहे, निसर्ग थोडा साथीला न्हवता, पाऊस नसल्याने ऐन लागणीच्या वेळीच पाणी कमी पडले, उगवण नीट झाली नाही, मुळात लागण लेट झालेली त्यात उगवण नीट नाही, फुटवा कमी त्यामुळे मी खूपच निराशा झाली होती, तरी देखील खचून न जाता दादांच्या मार्गदर्शनाखाली मी नियोजन सुरू ठेवले, असे कष्ट घेतले त्यामुळेच आज प्लॉट बघून खूप समाधान होत आहे,
मला शेतीचा गंध नसताना देखील मी बांधावर राहून अशी चांगली शेती करतोय ते पाहून माझ्या आजूबाजूचे शेतकरी देखील मला सल्ला विचारत आहेत, मी देखील न वेळ घालवता माझ्याकडे उपलब्ध असलेले दादांचे नियोजन त्यांना देतो, अँड्रॉइड ॲप अतिशय सोपे आहे, मोफत आहे, त्यात दिवसा नुसार काय करायचे याची माहिती मिळते, आपल्या सोईनुसर आपण खात निवडू शकतो, फवारणी आळवणी कधी करावी, जीवाणू कधी किती सोडावेत सगळी माहिती कळते, शिवाय सगळी टीम फोन वर सतत उपलब्ध असते, खरे तर ऊस संजीवनी या उपक्रमाचे करेल तेवढे कौतुक थोडे आहे असे मला वाटते, मी या संपूर्ण परिवाराचा मनापासून रूनी आहे, संजीव दादा, बाळासाहेब गुरव, अजिंक्य यांचा मी आभार व्यक्त करतो, मला ऊस संजीवनी परिवारात सामील होऊन माझ्या सोबत माझ्या जवळच्या इतर शेतकऱ्याचे देखील उत्पादन वाढवता आले यात खूप समाधान मिळत आहे, या प्लॉट मध्ये एकरी 100 च्या जवळपास नक्की उत्पादन मिळेल असा आत्मविश्वास मागील वर्षीच्या अनुभवावरून आता मला आला आहे, धन्यवाद
जय हिंद जय महाराष्ट्र
जय जवान जय किसान. 🚩🚩
ऊस संजीवनी स्टॉक पॉईंट आष्टा.
ब्लॅक बॉक्स ™️ आळवणी किट*, *ऊस संजीवनी ®️ फवारणी किट*, *सॉईल पावर जिवाणू किट उपलब्ध आहेत तसेच गेल्या 10 वर्ष्या पासून आपले भारतीय पोस्ट ऑफिस सोबत टायअप असल्याने प्रत्येक शहरात आणि प्रत्येक लहान मोठ्या खेड्या पोहोच मिळते.
संपर्क : अजिंक्य माने 09403964040
www.ajinkyamane.com/Products.html
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: