ऊस संजीवनी तंत्रज्ञान- भाग २ - डॉ. श्री. बाळकृष्ण जमदग्नी (वनस्पती शरीर क्रिया शास्त्रज्ञ)
Автор: Nature Care Fertilizers
Загружено: 2021-02-22
Просмотров: 90937
नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत
🌱🍀शेतकरी संवाद🍀🌱
आजचा विषय - ऊस संजीवनी तंत्रज्ञान- भाग २
सादरकर्ते - डॉ. श्री. बाळकृष्ण जमदग्नी (वनस्पती शरीर क्रिया शास्त्रज्ञ)
नमस्कार,
डॉ. जमदग्नी सरांच्या मागील मार्गदर्शनात त्यांनी आपल्याला ऊस पिकाचे शरीर क्रिया शास्त्र, आवश्यक व अनावश्यक घटक याविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे.
या भागात ते आपणास ऊस संजीवनी तंत्रज्ञानाचे महत्व, व संजीवकांचा योग्य वापर कसा करावा या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. ते स्वतः या तंत्रज्ञानाचे जनक असून त्यांनी आजपर्यंत याविषयी चे अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत.
डॉ. श्री. बाळकृष्ण जमदग्नी हे एम. एस. सी. असून वनस्पती शरीर क्रिया शास्त्रज्ञ आहेत, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ लातूर येथून निवृत्त प्राध्यापक देखील आहेत. त्यांनी ऊस संजीवनी तंत्र, सुपर केन नर्सरी यासारखे अनेक नाविन्यपूर्ण, आधुनिक व उपयुक्त असे विषय आजवर शेतकऱ्यांसमोर मांडले आहेत.
महाराष्ट्रात ऊस उत्पादन घेणारे असंख्य शेतकरी आहेत, आपले ऊसाचे उत्पादन भरघोस निघावे असे प्रत्येकालच वाटत असते. अनेक वेळा खूप प्रयत्न करून देखील आपले सरासरी उत्पादन हे ८० टनांच्या पुढे जाऊ शकत नाही.
या समस्येला तोंड देण्यासाठी ऊस शेतीत कशाप्रकारे नियोजन करावे, संप्रेरकांचा संतुलित वापर करून उत्पादन कसे वाढवावे याबद्दल श्री. जमदग्नी सर आपल्याला या दोन भागांमधून सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांनी जरूर लाभ घ्यावा.
शाश्वत शेतीच्या मार्गदर्शनासाठी नेचर केअरचे फेसबुक पेज फॉलो करावे. तसेच नेचर केअर चे यूट्यूब पेज / naturecarefertilizers सब्स्क्राईब करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क- 9881584160
#Agri #agriculture #organic #organicfarming #GreenHarvest #GreenHarvestSpecial #organicfertilizer #biofertilizer
See less
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: