#शेवगा
Автор: सत्य माहिती..!!
Загружено: 2025-03-22
Просмотров: 23
हवामान
शेवग्याची लागवड सर्व हवामानात करता येते. सर्वसाधारणपणे २५ ते ३० डिग्री सें. तापमानात वाढ चांगली होते. तसेच तापमान ४० डिग्री सें. पेक्षा जास्त असल्यास फुलगळ होते.
लागवडीसाठी जमीन
शेवग्याची लागवड हलक्या, माळरान जमिनीत तसेच डोंगरउताराच्या जमिनीत करता येते. चोपण जमिनीत शेवग्याची लागवड करू नये. जमिनीचा सामू ६-७.५ असावा.
वाण / जाती
शेवग्यासाठी कोकण रुचिरा, पी.के.एम-१, पी.के.एम.-२, जाफना, चेम मुरंगा या वाणांचा वापर करावा.
लागवड
शेवग्याची अभिवृध्दी फाटे कलम अथवा बियापासून रोपे तयार करून केली जाते.
फाटे कलम न मिळाल्यास पाँलीथीनच्या पिशवीत बियांपासून रोपे तयार करून लागवड करावी. एक ते दोन महिन्यांची रोपे लागवडीकरीता वापरावीत. हेक्टरी लागवडीकरीता ५०० ग्रँम बियाणे लागते. बीयाणासाठी नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये चौकशी करावी.
लागवड करण्यापुर्वी पावसाळ्यापुर्वी ६० X ६० X ६० आकाराचे ख़ड्डे घ्यावेत. हे खड्डे चांगली माती एक घमेले कुजलेले शेणखत, २५० ग्रँम सुफला (१५.१५.१५) आणि ५० ग्रँम फॉलीडॉल पावडर टाकून भरावेत.
बहुवर्षीय वाणासाठी ४ X ४ मिटरवर लागवड करावी व एकवर्षीय वाणासाठी २.५ X २.५ मिटरवर लागवड करावी.
व्यवस्थापन
शेवग्याच्या झाडास दरवर्षी १० किलो शेणखत, १७० ग्रँम युरीया, ४७० ग्रँम सुपर फॉस्फेट व १२५ ग्रँम म्युरेट आँफ पोटँश ही खते द्यावीत (माती परीक्षणानुसार खते द्यावीत).
शेवग्याच्या झाडाची लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यानंतर पहिली व ७ ते ८ महिन्यांनी दुसरी छाटणी करावी. पहिल्या छाटणीच्या वेळी झाडाचे मुख्य खोड जमिनीपासून एक मिटर अंतरावर छाटावे आणि दुस-या छाटणीच्यावेळी फांद्या छाटाव्यात.
शेवग्याच्या लागवडीनंतर ८ ते १० महिन्यांनी शेवग्याच्या शेंगा काढणीस तयार होतात. शेवग्याच्या प्रत्येक झाडापासून सुमारे ३० ते ३५ किलो हिरव्या शेंगा मिळतात.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: