खंबाटकी घाटातून नवीन बोगदयातून वाहने सुसाट,प्रायोगिक तत्वावर वाहतूक सुरु,नवीन टोलनाका नाही
Автор: Shirwal Breaking News
Загружено: 2026-01-18
Просмотров: 54
आशियाई महामार्ग 47 वरील महत्त्वपूर्ण असलेल्या खंबाटकी घाटामध्ये जुन्या बोगदया व्यतिरिक्त परदेशाच्या धर्तीवर आणखी सर्वसुविधांयुक्त अत्याधुनिक दोन नवीन बोगदे निर्माण करण्यात आले असून प्रायोगिक तत्वावर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून शनिवार दि.17 जानेवारी 2026 पासून एक मार्गिकेवरून सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे वाहतूक वळविण्यात आल्याने वाहनचालकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत असून सातारा बाजूकडून नवीन बोगद्यातून वाहने सुसाट येत असल्याने वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.विशेष म्हणजे खंबाटकी घाटामध्ये कोणत्याही प्रकारचा नवीन टोलनाका उभारण्यात येणार नसल्याने नवीन टोलनाक्याचा प्रश्न निकाली निघाल्याने याठिकाणी वाहनचालकांना टोल भरावा लागणार नाही. वाई व खंडाळा या दोन तालुक्यांना जोडणारा व आशियाई महामार्गावरील महत्त्वपूर्ण समजला जाणारा खंबाटकी घाट आहे.याठिकाणी युती शासनाच्या काळामध्ये वारंवार वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी लक्षात घेऊन तत्कालीन युती शासनाच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असणारे मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयआरबी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत खंबाटकी घाटाला पर्याय म्हणून सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे जाण्याकरिता एका बोगदयाची निर्मिती करण्यात आली होती.दरम्यान,हे करीत असताना आजच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता हा बोगदाही वाहतुकीच्यादृष्टीने कमी पडू लागल्याने नवीन बोगदयाची मागणी अनेक वर्षांपासून वाहन चालकांकडून व नागरिकांकडून होत असताना आजच्या घडीला या दोन बोगदयांच्या भूमिपूजनाचा मुहूर्त सापडला आहे.यामध्ये जुन्या बोगदया व्यतिरिक्त 1.4 किमीचे प्रत्येकी एक असे दोन बोगदे तीन लेनचे असून याठिकाणी अंदाजित 926 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.एकूण वाहतुकीसाठी जुन्या बोगदयासहित एकूण तीन बोगदे होणार असल्याने वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.या बोगदयांचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तीन लेन असून 15 मीचे ड्रायमिटर आहे.या बोगदयांमध्ये सर्वसुविधांयुक्त व अत्याधुनिक सुविधा देण्यात आले असून यामध्ये वाहनांचा धूर बोगदयांमध्ये थांबून राहू नये याकरिता वाहनचालकांच्या व प्रवाश्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक्झास्ट फॅन बसवण्यात आले आहे.याठिकाणी विविध ठिकाणी सेन्सर बसवण्यात आले असून त्यामुळे अपघातानंतर तत्काळ आपत्कालीन यंत्रणा काही वेळातच अपघातस्थळी पोहोचण्यास मदत होणार आहे.त्याचप्रमाणे 24 तास वीजपुरवठा होण्याकरिता सबस्टेशनच्या 2 बिल्डिंगची उभारणी करण्यात येणार आहे.याठिकाणी बोगद्यांमध्ये प्रकाशझोत व्यवस्थित येण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आली असून बोगद्यांमध्ये लाईनिंग काँक्रीटचे पांढरे अस्तरीकरण असल्याने प्रकाशझोत मोठ्या प्रमाणात राहणार आहे.पर्यावरणाच्या दृष्टीने खेळती हवा राहण्यासाठी विविध यंत्रणा बसविण्यात येणार आहे.यामध्ये परदेशात असणाऱ्या बोगदयांच्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बोगदयांसहित 6.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये वाहतुकीचा खोळंबा झाल्यास वाहतूक वळवण्याकरिता 3 आपत्कालीन व्यवस्थेसाठी दोन्ही बोगदयांना जोडणाऱ्या क्रॉस टनेलची निर्मिती करण्यात आली असून अत्याधुनिक पद्धतीचा कॅमेरा त्याचप्रमाणे संकटकालीन मदतीसाठी विविध ठिकाणी फोन सिस्टीम बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सदरच्या दोन बोगदयांमुळे खंबाटकी घाटातील 9 किलोमीटरपैकी 2 किलोमीटर अंतर कमी होणार असून वाई तालुक्यातील वेळे,खंडाळा तालुक्यातील बेंगरुटवाडी याठिकाणी उड्डाणपुलाची काम प्रगतीपथावर आहे.यामध्ये सहा लेनच्या दरीपुलाचाही समावेश आहे.त्याचप्रमाणे पुणे ते सातारा व सातारा ते पुणे असे तीन लेनचे सर्वसुविधांयुक्त महामार्ग बनविण्यात येणार आहे. एकूणच खंबाटकी घाटामध्ये जुन्या बोगदयासहित तीन बोगदयांची निर्मिती झाली असल्याने वाहतुकीवरील ताण कमी होणार असून खंबाटकी घाटामध्ये सातत्त्याने होणाऱ्या अपघाताची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे नवीन टोलनाक्याचे भूत वाहनचालकांवर बसणार नसल्याने व वाहतुकीचा प्रश्न सुटल्याने वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.-अपघातानंतर तत्काळ आपत्कालीन सेवा खंबाटकी घाटामध्ये निर्माण करण्यात येणाऱ्या बोगदयांमध्ये अपघात घडल्यास अत्याधुनिक सुविधांमुळे त्याचठिकाणी लगेच कार्यान्वित करण्यात येणाऱ्या आपत्कालीन व्यवस्थेला माहिती मिळत अपघातग्रस्तांना मदत तत्काळ उपलब्ध होणार आहे. याकरिता खंबाटकी घाटात दोन नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. -वाहने सुसाट. खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून शनिवार दि.१७ जानेवारीपासून हलक्या वाहनांसाठी सातारा ते पुणे बाजूकडे वाहतूक वळविण्यात आल्याने वाहनचालकांनी नवीन बोगद्यातून वाहने सुसाट नेल्याने त्यांचा आनंद गगनात मवाट न्हवता.त्यामुळे नवीन बोगद्यातून वाहने सुसाट असा प्रसंग आज पाहण्यास मिळाला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: