कुर्डूगड | विश्रामगड | वीर बाजी पासलकरांचा विश्रांती स्थळ | ताम्हिणी थळ देव लिंग्या घाटाचा पहारेकरी
Автор: Nagar Trekkers
Загружено: 2025-08-12
Просмотров: 930
बाजी पासलकर कुर्डूगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला विश्रामगड असेही नाव
.
प्राचीन काळा पासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ताम्हणी, थळ, देव घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. ताम्हणी घाटाचे रक्षण करण्यासाठी कुर्डुगड (विश्रामगड) हा किल्ला बांधण्यात आला होता
.
उंबर्डी मधील प्राचिन मंदिराचे अवशेष पाहून समोरचा डोंगर चढून आपण कुर्डुपेठमधे दीड तासामधे पोहोचू शकतो
.
सुळक्याच्या आकाराचा माथा असलेला कुर्डूगड किल्ला सह्याद्रीच्या कोकणात उतरणाऱ्या एका धारेवर वसलेला आहे. या धारेवर कु्र्डूपेठ नावाची लहानशी वस्ती वसलेली आहे. या वस्तीमधे कुर्डाईदेवीचे मंदिर आहे. म्हणून किल्ल्याला कुर्डूगड असे नाव पडले आहे.
.
किल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या अगोदर डाव्या बाजूला पाण्याच टाक आहे. कातळात खोदलेल्या पायर्या चढुन उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळकाच आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर प्रथम एका उध्वस्त वास्तूचा चौथरा दिसतो. त्याच्या समोर १ मीटर उंचीची हनुमान मूर्ती आपल्या नजरेस पडते. या हनुमानाने आपल्या पायाखाली पनवतीला जखडून ठेवलेले आहे. मुर्तीच्या पुढे एक निसर्गनिर्मीत गुहा आहे. यात १०० ते १५० माणसे सहज बसू शकतील
.
#kurdugad #fortsofmaharashtra #kokankhidaki #tamhinighat #lingyaghat #umbardi #mangaon #kokan #nagartrekkers
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: