Raigad मध्ये Sunil Tatkare vs Bharat Gogawale यांच्यातला संघर्ष एवढा तीव्र होण्यामागे कारणं कोणती ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-03
Просмотров: 15987
#BolBhidu #SunilTatkare #BharatGogawale
आधी दोन वक्तव्य सांगतो. पहिलं वक्तव्य, तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी आमची, आज आम्ही सुनील तटकरे यांच्या खासदारकीची गॅरंटी घेतली आहे. विधानसभेला त्यांना आमची गॅरंटी घ्यावीच लागेल. वक्तव्याची तारीख १९ एप्रिल २०२४. दुसरं वक्तव्य, विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड हे सुनील तटकरे यांनीच पाठवले होते. जे आम्हाला गुंड म्हणतात, तेच स्वतः गुंड पाठवून षडयंत्र रचत आहेत. वक्तव्याची तारीख २ डिसेंबर २०२५. दोन्ही वक्तव्य एकाच व्यक्तीची, महाडचे शिंदेसेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांची. वक्तव्यं आक्रमक, पण विषय १८० डिग्रीमध्ये वळलाय. लोकसभेला तटकरेंची गॅरंटी घेऊन त्यांना निवडून आणायला फुफाटा उडवणाऱ्या गोगावलेंनी तटकरेंवर षडयंत्र रचायचे आरोप केले. निमित्त ठरली एक घटना.
मंगळवार २ डिसेंबरला महाड नगरपरिषदेसाठीचं मतदान सुरु असताना राष्ट्रवादीचे युवक राज्य उपाध्यक्ष सुशांत जाबरे आणि भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले या दोघांचे गट आमनेसामने आले. मोठा राडा झाला, कॉलर धरल्या, गाड्या फोडल्या. मग बातम्या आल्या, सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केली आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना बंदूक दाखवली. विकास गोगावले बंदूक घेऊन पोलिस ठाण्यात गेले. प्रचंड राडा. ज्यानंतर एक बातमी सगळीकडे गाजली, रायगडमध्ये पुन्हा एकदा शिंदेसेना विरुद्ध तटकरे. दर आठवड्याला होणारा पण दर पाच वर्षांनी हमखास मिटणारा हा वाद आहे काय ? तो कॉलर पकडण्यापर्यंत कसा गेलाय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: