गेवराई मतदार संघातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय निवासस्थानाचा सभागृहात केली.
Автор: vijaysinh pandit
Загружено: 2025-07-07
Просмотров: 460
गेवराई विधानसभा मतदार संघात गेवराई, चकलांबा, तलवाडा आणि पिंपळनेर, ता.बीड हे चार पोलिस ठाणे कार्यान्वित आहेत. पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या वाढीमुळे भौगोलिकदृष्ट्या नागरीकांना पोलिस ठाण्याशी संपर्क करताना मोठ्या अडचणी येत आहेत. वाढलेली लोकसंख्या, गुन्हेगारी आणि अपुरे पोलिसबळ यामुळे पोलिसांनाही तपास कार्यात अडचणी येत आहेत. लोकसंख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन गेवराई विधानसभा मतदार संघातील पोलिस दलाची पुनर्रचना करून मौजे पाचेगाव, ता.गेवराई व टाकरवन, ता.माजलगाव येथे नवीन पोलिस ठाणे निर्माण करावे आणि सिरसदेवी येथे नवीन पोलिस चौकीचे निर्माण व्हावे अशी मागणी आज सभागृहात केली.
‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय' हे पोलिस दलाचे ब्रीद वाक्य आहे. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी पोलिस दल अहोरात्र झटत आहे. पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना हक्काची निवासस्थाने उपलब्ध झाली पाहिजेत, त्यांच्या अडीअडचणी शासनाने सोडविल्या पाहिजेत. गेवराई विधानसभा मतदार संघातील सर्व पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना सुसज्ज शासकीय निवासस्थाने उपलब्ध करावीत अशी मागणी औचित्याच्या मुद्याद्वारे सभागृहात केली.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: