संपूर्ण कोरडे हवामान व जोराची थंडी कधी ? ।
Автор: White Gold Trust (Gajanan Jadhao)
Загружено: 2025-11-02
Просмотров: 35333
🌦हवामान अंदाज🌦
👉 बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर पर्यंत विदर्भ मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही प्रमाणात आभाळी हवामान अपेक्षित आहे व काही तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पावसाचा अंदाज असून हा पाऊस सार्वत्रिक किंवा मोठ्या प्रमाणात नसेल विखुरलेला पाऊस राज्यातील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील एकदम तुरळक भागात होऊ शकतो या दरम्यान थंडी सामान्य राहून सुरु असलेलं तापमान कायम राहील.
👉 गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर पासून राज्यात संपूर्ण कोरड हवामान राहून पूर्ण नोव्हेंबर मध्ये पुन्हा पावसाचा अंदाज नाही तसेच ६ व ७ नोव्हेंबर पासून थंडीत एकदम लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज दिसत आहे विदर्भ मराठवाडा खान्देशात आठवड्याच्या शेवट पर्यंत किमान तापमान १५ अंशापर्यंत घसरतील व पूर्व विदर्भात त्याहून हि कमी तापमान राहू शकते तसेच त्या नंतरच्या दिवसांमध्ये तापमानात अजून घट होऊन १० - १५ अंशा पर्यंत तापमान राहू शकेल म्हणजे खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होईल.
🟢थोडक्यात कृषी सल्ला🟢
👉 हरभरा पेरणीची घाई करावी पेरणी पूर्वी हरभरा बियाण्याला ट्रायकोबूस्टची बीज प्रक्रिया अवश्य करावी व एकरी अर्धा किलो ट्रायकोबूस्ट रेती माती किंवा खतात मिसळून एका एकरात पेरणी पूर्वी किंवा पेरणी सोबत आवश्य वापरावा
बूस्टर हरभरा बियाणं मिळाल्यास आवश्य पेरावं.
👉 थंडी सुरू झाल्या बरोबर लगेच गव्हाच्या पेरणीला सुद्धा सुरुवात करावी गव्हाच्या प्रति किलो बियाण्याला रिहांश ५ मिली व लिहोसीन ३ मिली लावावे त्यामुळे पोंगे मर खोडअळीचे सुरुवातीचे नियंत्रण होऊन गव्हाची वाढ नियंत्रित राहून फुटव्यांची संख्या सुद्धा वाढवून उत्पादनात वाढ होते.
पेरणी सोबत गव्हाला एकरी एक ते दीड बॅग 10:26:26 किंवा एक DAP बॅग + अर्धी बॅग पोटॅश द्यावा सोबत जिवाणू खत एनपीके बुस्ट डीएक्स अर्धा किलो देऊ शकता.
संशोधित चांगले फुटवे करणाऱ्या गव्हाचे एकरी २० ते ३० किलो व सुधारित कमी फुटवे करणाऱ्या गव्हाचे एकरी ४० किलो बियाणे पेरावे.
👉 तूर कळी अवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा फवारा हा कळी अवस्थेत किंवा फुलाला सुरुवात झाल्यानंतर द्यावा ज्यामध्ये अळीचे नियंत्रणासाठी इमान १० ग्रॅम किंवा मस्केट ३० मिली हेच घ्यावं या सोबत फुलांची संख्या वाढण्यासाठी झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम आणि मादी फुलांची संख्या वाढण्यासाठी झिंक edta २० ग्रॅम घ्यावं
मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी प्रचंड फुलोरा अवस्था म्हणजे ५० टक्के फुलोरा अवस्था आहे अशा ठिकाणी तुरीला दुसरा फवारा सुद्धा करायला हरकत नाही या मध्ये अळी व शेंगमाशी यांच्या नियंत्रणासाठी रावडी १५ मिली किंवा सिंजो १० मिली घ्यावं परागीकरणाची वाढ होण्यासाठी बोरन २० ग्रॅम लवकर फुलांचे रूपांतर शेंगा मध्ये होण्यासाठी भरारी ७ मिली व सोबत ०:५२:३४ १०० ग्रॅम देऊ शकता.
#थंडीचीसुरुवात ❄️ #कोरडेहवामान 🌬️ #हिवाळ्याचाSeason 🧣 #थंडीआलीरे ❄️#हिवाळ्यातीलथरथर 😄 #संपूर्णकोरडेहवामान 🌾#थंडीचाTadka 🥶 #MorningVibesInWinter ☀️ #FoggyMorning 🌫️ #थंडहवामानFeels 😍#WinterIsComing ❄️ #ColdWaveAlert 🧤 #DryWeatherModeOn 🌬️ #FreezingFeels 🧊 #WinterSeason2025 ❄️ #MaharashtraWinterVibes 🏔️ #ChillVibesOnly ☕ #ColdMorningMood 🌫️ #FogAndFrost ❄️
#WinterReelReady 🎥#WeatherUpdate2025 #ColdWeatherAlert #हवामानबदल 🌦️#हवामानLive #थंडीचेआगमन ❄️ #WeatherReportIndia
#थंडीआलीरे #WeatherUpdate #ColdWave #WinterSeason2025 #हवामानबदल #ColdMorning #FoggyDay #DryWeather #MaharashtraWeather #WinterAlert
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: