पावसाळ्यातील महाबळेश्वर, धुक्याची दुनिया | Mahabaleshwar in Monsoon, Rainy Season | Kokankar Avinash
Автор: Kokankar Avinash
Загружено: 2025-07-30
Просмотров: 30845
पावसाळ्यातील महाबळेश्वर, धुक्याची दुनिया | Mahabaleshwar in Monsoon, Rainy Season | Kokankar Avinash
प्रतापगड दर्शन झाले आणि आम्ही निघालो महाबळेश्वरच्या दिशेने. पोलादपूर वाई रस्त्याला, आंबेनळी घाटाचा परत प्रवास सुरु झाला. धबधबे धुके आणि सुंदर वातावरणाचा आनंद घेत आम्ही पोचलो जुने महाबळेश्वर. एन्ट्री फी भरून आम्ही महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर आणि पुढे पॉईंट केला. धुके खूप होते आणि पोटात भूक लागलेली मग आम्ही गाडी वळवली महाबळेश्वर मार्केट मध्ये. मस्त शाकाहारी जेवण झाले आणि आमची स्वारी निघाली तापोळा च्या दिशेने. महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण. तिथे आपला आजचा मुक्काम होता.
#Mahableshwar #HillStation #RainySeason #MonsoonTrip
Places in Video : Mahableshwar, Satara, Maharashtra India
Month : 26 July 2025 (Monsoon Season Vlogs)
महाबळेश्वर ट्रिप २०२५ Full Playlist : https://tinyurl.com/3c2henxf
नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash
__________________________________________________________________________________
महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम तसाच आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे.
महाबळेश्वराच्या मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या पाच नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे देऊळ आहे.हे ठिकाण क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. 'सावित्री' ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिनी आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय.
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी, रासबेरी, जांभळाचा मध व लाल मुळे, गाजरे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळते.
पर्यटकासाठी येथे जुन्या महाबळेश्वर पासून ७ किमी अंतरावर खूप प्रेक्षणीय ठिकाणे आहेत शिवाय ५ मंदिरे आहेत की जी पूर्वीच्या काळातील भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवितात.
महाबळेश्वर बाजारपेठ
महाबळेश्वर बाजारपेठ फार प्रसिद्ध आहे. येथे लोकरीचे कपडे, स्वेटर, चमड्याचे पट्टे,चमड्याची पाकीटे इ. वस्तु विविध प्रकारात् मिळतात.तसेच येथे चणे फुटाणे प्रसिद्ध आहेत
पंचगंगा मंदिर
कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री, वेण्णा, सरस्वती, आणि भागीरथी या ७ नद्यांचे उगमस्थान आहे की जे पाहिलेच पाहिजे. यापैकी पहिल्या पांच नद्यांचा ओहोळ सतत बाराही महिने वहात असतो. सरस्वतीचा ओहोळ मात्र प्रत्येक ६० वर्षानी दर्शन देतो.
कृष्णाबाई मंदिर
पंचगंगा मंदिराचे पाठीमागे अगदी जवळच कृष्णाबाई नावाचे मंदिर आहे की जेथे कृष्णा नदीची पूजा केली जाते.
मंकी पॉइंट
या ठिकाणाला हे नाव दिलेले आहे त्याला कारण असे की नैसर्गिक रित्या येथे तीन दगड आहेत ते मंकी सारखे समोरासमोर बसलेले आहेत असे वाटते.
आर्थर सीट पॉइंट
समुद्र सपाटीपासून १,३४० मीटर उंचीवर असलेला हा महाबळेश्वरमधील एक पॉइंट आहे. सर आर्थर यांच्या नावामुळे या जागेला हे नाव मिळाले.
वेण्णा लेक (वेण्णा तलाव)
वेन्ना लेक हे पर्यटकांसाठी महाबळेश्वर मधील प्रमुख आकर्षक ठिकाण आहे.
केटस् पॉईंट (नाकेखिंड)
महाबळेश्वरचे पूर्व बाजूस हा पॉइंट आहे. येथून तुम्ही बलकवडी आणि धोम धरणांचा देखावा पाहू शकता.
नीडल होल पॉइंट / एलीफंट हेड पॉइंट
काटे पॉइंट जवळच हा निडल पॉइंट आहे. नैसर्गिक रित्या खडकाला सुईसारखे भोक आहे ते सहजतेने दिसते म्हनून त्याला नीडल होल नाव दिलेले आहे.
विल्सन पॉइंट
महाबळेश्वर मधील हा एकच पॉइंट असा आहे की, येथून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्तही पाहू शकता.
प्रतापगड
महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला २१ कि.मी.अंतरावर प्रतापगड आहे. दि.१० नोव्हे.१६५९ रोजी या किल्ल्यावर छ. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती, त्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
लिंगमळा धबधबा
महाबळेश्वर जवळ हा धबधबा आहे. साधारण पणे ६०० फुट उंचीवरून हे पाणी वेण्णा तलावात पडते.
__________________________________________________________________________________
Related Searches:-
Konkan / Kokan Vlog
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
kokankar avinash Rain video
Kokankar Avinash Monsoon Vlogs
Konkan Monsoon Vlogs
mahabaleshwar tourist places
Mahabaleshwar Trip
Mahabaleshwar Temple
Mahabaleshwar Points
Mahabaleshwar in Monsoon
Mahabaleshwar Hill Station
Mahabaleshwar Vlog
Mahabaleshwar Market
Mahabaleshwar in Rainy Season
Mahabaleshwar in Rain
__________________________________________________________________________________
For Promotion Contact : [email protected]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: