आतां पावेन सकळ सुखें । (नाटाचा अभंग) - संत तुकाराम
Автор: VISHWA SURYA
Загружено: 2020-04-13
Просмотров: 40345
आतां पावेन सकळ सुखें । (नाटाचा अभंग) - संत तुकाराम #विश्वनाथ_महाराज_वारिंगे
आतां पावेन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें ॥ अवघें सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥१॥
जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई ॥ सकळ गोताची च साई । पारिखें काई ऐसे नेणिजे ॥२॥
जगदाकारीं झाली सत्ता । वारोनि गेली पराधीनता ॥ अवघे आपुलेचि आतां । लाज आणि चिंता दुर्हावली ॥३
वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं ॥ करवी तैसें आपण करी । भीड न धरी चुकल्याची ॥४॥
सोसिला होता सासुरवास । बहुतांचा बहुत दिवस ॥ बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥५॥
करिती कवतुक लाडें । जम बोलविती कोडें ॥ मायबाप उत्तरें गोडें । बोले बोबडें पुढें तुका ॥६॥
स्वर - #विश्वनाथ_महाराज_वारिंगे
कोरस - #विवेक_वारिंगे
संकल्पना - #विवेक_वारिंगे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: