श्रीदत्त करुणात्रिपदी | शांत हो श्रीगुरूदत्ता | Shaant Ho Shri Gurudatta | Shree Datta Karunatripadi
Автор: Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
Загружено: 2025-08-07
Просмотров: 2290419
आजच्या अशांत काळात श्रद्धावानाच्या जीवनात असीम शांती आणू शकेल अशा, वासुदेवानंद सरस्वतीकृत 'करुणात्रिपदी' ह्या भक्तिरचनेविषयी सांगून, सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी, तिचे दररोज किमान एकदा असे सलग ३ वर्षे पठण करण्यास सांगितले आहे. दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या पितृवचनाची लिंकही सोबत देत आहोत.
• श्रीगुरु चरण दर्शन महिमा आणि करुणात्रिपदी ...
Lyrics
शांत हो श्रीगुरूदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ ध्रु. ॥
तू केवळ माताजनिता । सर्वथा तू हितकर्ता ।
तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ॥
भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ।
तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दाता ॥ १ ॥
अपराधास्तव गुरूनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ।
तरी आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ॥
तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करू धावा? ।
सोडविता दुसरा तेंव्हा । कोण दत्ता आम्हा त्राता? ॥ २ ॥
तू नटसा होउनि कोपी । दंडितांहि आम्ही पापी ।
पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरि नच संतापी ॥
गच्छतः स्खलनं क्वापि । असे मानुनि नच हो कोपी ।
निज कृपालेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ॥ ३ ॥
तव पदरी असता ताता । आडमार्गी पाऊल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दुजा त्राता ।।
निज बिरुदा आणुनि चित्ता । तू पतीतपावन दत्ता ।
वळे आता आम्हांवरता । करुणाघन तू गुरूदत्ता ॥ ४ ॥
सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हे घरदार ।
तव पदीं अर्पू असार । संसाराहित हा भार ।
परिहारिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबंधो ।
आम्हा अघलेश न बाधो । वासुदेवप्रार्थित दत्ता ॥ ५ ॥
#AniruddhaBapu #dattaguru #devotionalprayer
©℗
'करुणात्रिपदी'च्या पहिल्या पदाचा अर्थ - https://sadguruaniruddhabapu.com/post...
----------------------------------
Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c...
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Watch live events - https://www.aniruddha.tv
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
----------------------------------
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: