गावाकडच्या पद्धतीने केलेलं ताक आणि लोणी
Автор: purnabrahma पूर्णब्रह्म
Загружено: 2020-04-01
Просмотров: 55360
गाव,आजी आजोबा ,गावात पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे पदार्थ,गावातल्या गोड आठवणी ,शेत शेतातला जेवण ,शेतातल्या डेरेदार झाडाखालच्या थंडगार सावलीतली झोप या सर्व गोष्टी माझ्या खूप जवळच्या आहेत आणि आता आपण नौकरी करण्यासाठी गाव सोडून शहरात राहायला गेलो त्यामुळे या गोष्टी आपल्या सर्वांसाठीच खूप दुर्मिळ होत चालल्या आहेत त्यामुळे माझ्या मनात विचार आला की आपण गावी आलो आहोत तर इथले पदार्थ ,पदार्थ बनवण्याच्या पारंपरिक पद्धती हे सर्व शहरात राहून सुद्धा माझ्यासारख्याच गावाची आवड असणाऱ्यांना पाहता याव्यात म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आहे ज्यामध्ये दह्यावर घुसळण्याचे संस्कार करून ताक बनवलं आहे आणि उन्हाळ्यात फ्रीज नसतानासुद्धा घट्ट लोणी कसं बनवावं व ते लोणी वास न येऊ देता कसं टिकवाव ते सुद्धा सांगितलं आहे .
तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या आजी आजोबांच्या ,गावच्या आणि गावात बनवल्या जाणाऱ्या पदार्थांच्या काही आठवणी असतील तर त्या कंमेंट मध्ये मला सांगा आणि कोणत्या पदार्थाच्या पारंपरिक पध्दतीने केलेल्या रेसिपीस हव्या असतील तर ते सुद्धा सांगा मी त्या तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन
साहित्य
1 किलो दही
1.5lit-2lit पाणी
#लोणी,#loni,#ताक
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: