क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिर मध्ये बालजत्रेची धूम
Автор: Sahasrarjun Sheikshanik Sankul, Solapur
Загружено: 2026-01-04
Просмотров: 847
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे व बालिका दिनाच्या औचित्य साधून भव्य बाल जत्रेचे आयोजन
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहस्त्रार्जुन संकुलाच्या प्रांगणात प्राथमिक विभागातर्फे बालजत्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील पालकांकडून खाद्यपदार्थांचे स्टॉल ठेवले जातात .यावर्षी 70 ते 75 खाद्यपदार्थांचे स्टॉल होते .सदर बाल जत्रेचे उद्घाटन केशर ताई भूमकर ,सारिका बिद्री तसेच समाजातील प्रतिष्ठित महिला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कुमारी अंजली अलुरे हिने सावित्रीबाईंवर सुंदर गीत सादर केले.
स्त्रियांनी स्वावलंबी असले पाहिजे व आपल्या पाल्यास स्वावलंबनाचे संस्कार दिले पाहिजेत या दृष्टिकोनातून महिला पालकांनी घराबाहेर पडून एक संध्याकाळ आपल्या पाल्यासाठी या हेतूने अनेक महिला आपल्या कुटुंबासमवेत सदर बाल जत्रेते सहभागी झाल्या होत्या. सर्व संकुलातील पालक, परिसरातील जवळजवळ दीड ते दोन हजार नागरिकांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला .या स्टॉलवर भेळ, पाणीपुरी, कचोरी उत्तप्पा, दही धपाटे, मंचुरियन ,ब्राऊनी, स्वीट कॉर्न ,मलाई लस्सी ,सुगंधी दूध, कद्दू खीर अशा एक नाही तर अनेक पदार्थांची रेलचेल होती. सर्व पदार्थांचे भाव देखील योग्य होते त्यामुळेअबाल वृद्धापर्यंत सगळ्यांनी ही संध्याकाळ सहस्त्रार्जुन च्या प्रांगणात अतिशय रम्य वातावरणात घालवली. या कार्यक्रमाचा हेतू मुख्याध्यापिका सो मंजुषा माने यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. या कार्यक्रमाप्रसंगी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजू भूमकर, विठ्ठल मंदिरट्रस्टचे अध्यक्ष श्री संजीव बिद्री , सचिव जयकुमार कोल्हापुरे, संस्थेचे सचिव गजानन गोयल, सदस्य संजीव रंगरेज, गणेश दामजी, शिरीष कोल्हापुरे , तुकाराम पवार , भरतकुमार शालगर ,श्रीराम पवार, सुरेश बिद्री,अनिल रंगरेज प्रशालेचे मुख्याध्यापक श्री भगवंत उमदीकर, इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका सविता हातवळणे
त्याचबरोबर महिला मंडळाच्याअध्यक्ष सौ वर्षा मगजी युवती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष गीता हबीब, रंजीता रंगरेज, मोनाली रंगरेज ,विद्या गोयल, रूपाली दामजी ,विद्या पवार सुरेखा पवार , सरस्वती रंगरेज, पार्वती भुमकर अशा अनेक प्रतिष्ठित महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. सदर स्पर्धेत सहभागी स्टॉल धारकांचं परीक्षण करण्यासाठी सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक श्री निखिल लोमटे हे लाभले होते त्यांनी सर्व स्टॉलधारकांचे परीक्षण करून उत्कृष्ट स्टॉल धारकांचे अभिनंदन केले व सुधारणा आवश्यक असलेल्या स्टॉल धारकांना योग्य त्या सूचना दिले. त्याच बरोबर माता पालकांसाठी एवढ्या मोठ्याप्रमाणात बाल जत्रेचे आयोजन केल्याबद्दल शाळेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या बाल जत्रेत फुलांची आकर्षक रांगोळी, नंदीध्वज त्याचबरोबर सावित्रीबाईंच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शेळगी परिसरातील जणू छोटी गड्डा यात्रा पार पडली अशा भावना अनेक पालकांनी व नागरिकांनी व्यक्त केल्या. सदर कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ वंदना आळंगे, सुवर्णा केत तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी,सेविका यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती बुरगुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मी बिच्चल यांनी केले.
शेळगी परिसरातील पालक नागरिक यांच्याकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: