Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report
Автор: ABP MAJHA
Загружено: 2025-12-14
Просмотров: 3143
#DevendraFadnavis #VidhanSabha #maharashtravidhansabha
Maharashtra CM Devendra Fadnavis Speech Nagpur Winter Session Maharashtra Politics Abp majha
संकल्पना, शेरोशायरी, टोमणे, प्रत्युत्तरं आणि इशारे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसाचं भाषण अशा सर्व गोष्टींनी गाजलं. रचनात्मक महाराष्ट्र घडवण्यापासून ते गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठीच्या उपाययोजनांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश असणारं मुख्यमंत्र्यांचं भाषण आज लक्षवेधी ठरलं. एकीकडं महाराष्ट्राचं व्हिजन मांडताना दुसरीकडं विरोधकांच्या प्रश्नांना आणि टोमण्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रत्युत्तरं नेमकी कशी होती, याचा आढावा घेऊया, राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमधून.
((ओपन विथ मुख्यमंत्री शेर))
व्हिओ -
अधिवेशनात हा शेर ऐकवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना नेमकं काय म्हणायचं होतं, हे तेच सांगू शकतील.
मात्र त्यांच्या या शेरचे अनेक अर्थ लावत विधिमंडळाच्या अधिवेशनाची सांगता झाली.
सोमवारपासून सुरु झालेलं एका आठवड्याचं अधिवेशन आज संपलं.
शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण हे त्यांच्या घोषणा, इशारे आणि टोलेबाजी यामुळं चांगलंच गाजलं.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा पूर्वार्ध गाजला तो त्यांनी मांडलेल्या महाराष्ट्राच्या व्हिजनमुळे.
रचनात्मक महाराष्ट्र घडवण्यासाठी पावलं उचलण्याचा मनोदय फडणवीसांनी व्यक्त केला.
बाईट - देवेंद्र फडणवीस
((नवीन सरकार आल्याला एक वर्ष पुर्ण झालेत. जी आव्हाने आली ती पुर्ण करण्याचा प्रयत्न केला. - लोकशाहीच शेवटची संस्था ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही. नगरपालिका निवडणुकीत आम्ही विकासाचा अजेंडा मांडला. आम्ही कोणावर टिका केली नाही. सभागृहाच्या दोन ही बाजूच्या नेत्यांना माझी विनंती आहे. रचनात्मक महाराष्ट्र याचा विचार केला पाहिजे))
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: