शिळ्या भाताचे नविन रुप-स्वादिष्ट धिरडे बनवा १०मिनिटांत! Loftover Rice Pancake
Автор: माझ Kitchen
Загружено: 2025-03-30
Просмотров: 1155
शिळ्या भाताचे पौष्टिक धिरडे | Leftover Rice Pancake
आज मी उरलेल्या भाताचा स्वादिष्ट आणि पौष्टिक उपयोग करून एक खास रेसिपी तयार केली आहे – शिळ्या भाताचे धिरडे! या धिरड्यासाठी मी भरपूर भाज्या वापरल्या आहेत, ज्यामुळे ते चवदार आणि आरोग्यदायीही बनते.
कृती:
शिळ्या भातात गरम पाणी घालून 10 मिनिटे भिजवून ठेवा. नंतर मिक्सरमध्ये हा भात आणि एक उकडलेला बटाटा टाकून गुळगुळीत पेस्ट तयार करा. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, मेथी, कोथिंबीर, कांद्याची पात, मटार आणि हवे असलेले मसाले (ओवा, तीळ, तिखट, मीठ, हळद, हिंग, धणे-जिरे पावडर) घाला. 1 चमचा तेल आणि चिमूटभर सोडा टाकून मिक्स करा. पाणी घालून बॅटर तयार करा. गरम तव्यावर थोडे तेल आणि तीळ टाकून जाडसर बॅटर पसरवा आणि खरपूस भाजून घ्या.
हे स्वादिष्ट धिरडे चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा आणि घरच्यांसोबत आनंद घ्या!
#LeftoverRiceRecipe #HealthyBreakfast #EasyRecipe #Dhirde
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: