नाशिकमध्ये नागरी सत्कारप्रसंगी सांगितल्या बालपणीच्या आठवणी
Автор: BM NEWS Malegaon
Загружено: 2025-12-02
Просмотров: 158
सभोवताल पाहत अलगद टिपावा लागतो बद्धिवाद : डॉ. तारा भवाळकर
नाशिकमध्ये नागरी सत्कारप्रसंगी सांगितल्या बालपणीच्या आठवणी
नाशिक : गुरुजन आणि ग्रंथालयांचा माणसाच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. जन्मापासून मुलींना सरळ वळण लावणारे सर्व संस्कार मिळाले, तरी घरात कॉग्रेस, राष्ट्रसेवा दल, हिंदुत्ववाद, लाल बावटा अशा विविध विचारसरणीची माणसे असली की कुटंब एक होते. कारण "बद्धिवाद" हा कोणत्याही प्रशिक्षण संस्कार केंद्रात शिकविला जात नाही, तो भोवतालची परिस्थिती पाहत अगदी लहान मूलासारखा अलगद टिपावा लागत असल्याचा सुखद अनुभव ९८ व्या अखल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी सांगितला
प्रसाद हिरे मित्रमंडळ, भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्टतर्फे डॉ भवाळकर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन शनिवारी (ता. २९) गंगापूर रोडजवळील आयएमआरटी सभागहात करण्यात आले, त्या वेळी प्रकट मुलाखतीत त्या बोलत होत्या.
साडी, खण, सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
साहित्यिक प्रा. डॉ विनोद गोरवाडकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अजय शहा, लेखक, आर्किटेक्ट विजय सोहनी या तिघांनी त्यांची मुलाखत घेतली.
डॉ. भवाळकर म्हणाल्या, की मला उगीचच लोकसाहित्याच्या अभ्यासात गुंडाळून ठेवलेय. नाशिकहन सांगलील आल्यावर एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा अशा स्पर्धामध्ये भाग घेऊन लेखन आणि अभिनय दोन्ही गोष्टी केल्या. प्रत्येक वर्षीं अभिनयाचे पारितोषिक पटकावून १९७५ मध्ये शासनाचे अभिनयाचे रौप्यपदक " मिळवून रंगमंच कायमचा सोडला. कोणत्याही गोष्टीला फार काळ चिकटून राहायचे नाही म्हणून लोकसाहित्याच्या अभ्यासाकडे वळले... त्यानंतर कोकण, कर्नाटक, गोवा, तेलंगणा, केरळ अशी भ्रमंती करीत लोकसाहित्याचा अभ्यास केला. नाशिकच्या आठवणी उलगडताना आजोबा रावसाहेब पिंगळे यांच्याकडे वास्तव्यास असतानाचे प्रसंग.. बुद्धीवाद कसा शिकता आले याचे खास प्रसंग सांगताना त्यांनी उपस्थितांना हसविले..
"मविप्र'चे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले, 'सावाना' चे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, स्वागताध्यक्ष प्रसाद हिरे, गीतांजली हिरे, प्रणव हिरे, डॉ. प्रशांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. लोकेश शेवडे यांनी परिचय करून दिला. स्मिता पाटील यांनी सूत्रसंचलन केले आणि त्यांच्याच सुमधुर आवाजातील पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली. प्रा. डॉ. रविंद्र हिरे यांनी आभार मानले.
चौकट
...अन थेट शिकवायला गेले..
श्रीरामपूरला शासनाच्या शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या जोरावर वयाच्या १८ व्या वर्षी पहिली नोकरी नाशिकच्या न्यू एन्युकेशन गर्ल्स हायस्कूलमध्ये लागली. त्यानंतर बहिःस्थ विद्यर्थिनी म्हणून परीक्षा देत गेले; पण एचपीटी महाविद्यालयाचे प्रा. मामा पाटणकर यांचे भक्कम पाठबळ मिळाल्याने शिक्षण पूर्ण करतां आले. एकही दिवस् महाविद्यालयात न जाता पीएच.डी. झालेली डॉक्टर, प्राध्यापिका थेट महाविद्यालयात शिकवायला गेल्याची आठवण डॉ. भवाळकर यांनी सांगितली.
इति डॉ. भवाळकर...
आपल्या भोवताली काय घडतं याचं निरपेक्ष टिपण करणं म्हणजे बुद्धी प्रामाण्यवाद होय..
• जे विचार करायला भाग पाडते ते ज्ञान होय, माहिती मिळवणे म्हणजे ज्ञान नव्हे..!
*आजकाल साधनं मिळणे सुलभ झाले त्यामुळे त्याच महत्व कमी झाले आहे.
पुस्तकं खरेदी करून प्रत्यक्ष वाचनाचे व्यसन जडायला हवं..
मराठी शाळा बंद होत आहेत यावर मराठीचा अभिनिवेश बाळगणाऱ्यांनी चिंता आणि चिंतन करायला हवे अन्यथा आमची अस्मिता आम्ही कशी मोजणार ?
आम्ही पदवीधर आहोत म्हणजे आम्ही शिक्षित आहोत असे अजिबात नाही
अर्थकेंद्रित जग झाल्याशिवाय स्त्री जीवनाचा उद्धार होणार नाही. स्त्रियांच्या श्रमाचं आर्थिक कसोटीवर जोवर मूल्यमापन होत नाही तोवर स्त्रीमुक्तीची चर्चा एकाकी ठरेल..
माहेरवासियांकडून सत्कार होतोय याचा मनस्वी आनंद होतोय.
फोटो कॅप्शन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या नागरी सत्कारप्रसंगी स्वागताध्यक्ष प्रसाद हिरे, सौ. गीतांजली हिरे, "मविप्र" संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, "सावाना"चे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, प्रणव हिरे, आर्कि. विजय सोहनी, डॉ. प्रशांत सूर्यवंशी, साहित्यिक डॉ. विनोद गोरवाडकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अजय शहा, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे लोकेश शेवडे आदी...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: