पाईट येथे बॉश इंडिया व दरेकर सोशल फाउंडेशन यांचा वतीने मोफत किसान कार्ड नोंदणी अभियान संपन्न
Автор: Jan Sanvad News Pune
Загружено: 2025-03-14
Просмотров: 167
#jansanvadnewspune, #जनसंवादन्यूजपुणे,
#graminnews, #khednews, #punenews, #ruralnews, #viralnews, #pait, #boschindiafoundation, #jaishingdarekar, #darekarfoundation, #kissancard, #farmeridcard, #farmer, #ruralfarmer, #freefarmercamp
गुरुवार, दि. १३ मार्च २०२५
पाईट - खेड - पुणे
Headline -
पाईट येथे बॉश इंडिया फाउंडेशन व दरेकर सोशल फाउंडेशन यांचा वतीने मोफत किसान कार्ड नोंदणी अभियान संपन्न
पाईट परिसरातील ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला
बॉश इंडिया फाउंडेशनचे सीएसआर प्रतिनिधी रोहित बलुरे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर यांनी केले कॅम्प आयोजन
किसान कार्डची नोंदणी केल्यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होऊन शासकीय योजनांचा लाभ होईल
पाईट आणि परिसरातील गावातील शेतकऱ्यांसाठी बॉश इंडिया फाउंडेशन, दरेकर सोशल फाउंडेशन, मंडल अधिकारी पाईट व ग्रामपंचायत पाईट यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी दिनांक 11 ते 13 मार्च 2025 या तीन दिवसांसाठी मोफत किसान कार्ड नोंदणी अभियान ग्रामपंचायत कार्यालय पाईट या ठिकाणी घेण्यात आले. यामध्ये पाईट, रौंधळवाडी,आहिरे, तोरणे, परळे, हेद्रुज, बच्चेवाडी, अनावळे, पाळू, कासारी, सुपे, आडगाव, धामणे, कुरकुंडी, आसखेड, तोरणे बुद्रुक, टेकवडी, वाघू. या गावातील 700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला व 500 पेक्षा जास्त लोकांनी प्रत्यक्ष लाभ घेतला
सदर कॅम्प पूर्णतः मोफत असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
किसान कार्डची नोंदणी केल्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे तसेच शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होणार आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाहीत
सदर कॅम्पचे आयोजन बॉश इंडिया फाउंडेशनचे सीएसआरचे प्रतिनिधी रोहित बलुरे, राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष जयसिंग दरेकर, पाईट मंडल अधिकारी मनिषा सुतार , ग्रामविकास अधिकारी अनिल फुलपगार यांनी केले.
यावेळी उपस्थित तिरुपती गवळी पतसंस्थेचे अध्यक्ष हिरामण रौंधळ, मा.चेअरमन पंडित रौंधळ, मा. उपसरपंच गुलाब खेंगले, युवक संघटक युवराज बंदावने, चेअरमन विजय करंडे, मा.सरपंच मंगल भांगे,कारभारी बबन खेंगले, कृषी सहाय्यक अमृता मॅडम, ग्राममहसूल अधिकारी श्री. माणिक क्षीसागर, कसबे मॅडम, जगताप साहेब, निलेश मांजरे, बाळासाहेब पापळ, संचालक नंदूशेठ डांगले. आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी : डॉ. देवेंद्र ओव्हाळ (जन संवाद न्यूज पुणे) - 9921271621
विडिओ एडिटिंग : सुनील वाघचौरे - 8104710017
JAN SANVAD NEWS PUNE I जन संवाद न्यूज पुणे
सामाजिक I शैक्षणिक I राजकीय I सांस्कृतिक I आरोग्य I कृषी
बातम्या जाहिराती व अधिक माहितीसाठी संपर्क:
8104710017 I 9921271621
Email : [email protected]
#jansanvadnewspune, #जनसंवादन्यूजपुणे
आपल्या विभागातील बातम्या पाहण्यासाठी
'जन संवाद न्यूज पुणे' या YouTube चॅनेलला
Subscribe l Like l Comment l Share करा!
News Theme 2 by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. https://creativecommons.org/licenses/...
Artist: http://audionautix.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: