Chaitanya Maharaj Degloorkar, Patharwadi Tq. Renapur Dist. Latur, Balsanskar Shibir बालसंस्कार शिबीर
Автор: ADHYATMIKPEETH
Загружено: 2026-01-03
Просмотров: 58
श्री महादेव आणि हनुमान मंदिर अध्यात्मिक पीठ पाथरवाडी येथे कार्यरत असून विविध सामाजिक प्रश्न समोर ठेवून त्याची सोडवणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून नोव्हेंबर २०२४ मध्ये एका बालसंस्कार शिबीराचे आयोजन अध्यात्मिक पीठ आणि भारत विकास परिषद सिध्देश्वर शाखा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. आज विद्यार्थी वर्ग हा अधिक तंत्रस्नेही झाला असून मोबाईल, संगणक आणि टी. व्ही. च्या अधिपत्याखाली भरडला जात आहे. शाळा आणि कुटूंबाकडून केले जाणारे संस्कार मर्यादित स्वरूपात आहेत.
हे शिबीर स्वच्छ सूर्यावरणात आणि निसर्गरम्य वातावरणात आयोजित केले जात आहे. तेथे आपल्याला नवीन मित्रांसोबत खेळ खेळता येतील तसेच अध्यात्म, प्रवचन, किर्तनाचा आनंद घेता येणार आहे. तसेच देशभक्त, कांतीकारक यांच्या कथा, ऐकावयास मिळणार आहेत. स्वावलंबन, अनुशासन, इ. चे धडे घेता येतील. शरीर सुदृढ व्हावे म्हणून योगासने, सुर्यनमस्कार, गीत गायन आणि संस्कृत सुभाषिते आणि संभाषण, भारतीय संस्कृती, धर्म आणि परंपरा यांची ओळख आणि श्रीमदभगवदगीता, हनुमान चालिसा, ज्ञानेश्वरी, इ. चा अभ्यास करण्याची सुसंधी आपल्याला प्राप्त होत आहे. अक्षर सुधारणा, प्रश्नमंजुषा, श्रमदान इ. चा अनुभव मिळेल एकूणच आपल्या पाल्याचा व्यक्तिमत्व विकास घडावा असा प्रयत्न आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: