स्पर्धा परीक्षांचा पोरखेळ थांबवा.... Strengthen MPSC.. केरळचा आदर्श घ्या !!
Автор: Ajit Abhyankar
Загружено: 2023-09-12
Просмотров: 2226
महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणेत सुमारे ४ लाख ५० हजार इतकी रिक्त पदे आहेत. सरकार अस्तित्वात नसल्यासारखेच होते आहे... नोकरशहांच्या खास 'उत्पन्ना' चे मुद्दे सोडले तर, कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी होत नाही. भ्रष्टाचार हा नियम आहे. एकल महिलांचे पेन्शन देण्याच्या अर्जापासून ते शाळांचे अनुदान देण्यापर्यंत सर्वत्र कमिशनवरच काम होते. आता तर कर्मचारी भरतीचे कंत्राट खाजगी कंपन्यांना देऊन त्यांनी आपले भ्रष्टाचाराचे कुरण उघडले आहे. पेपर फुटत आहेत.... निवडक खास उमेदवारांना ऐनवेळी उत्तरे पुरविली जात आहेत... सर्व सरकारी कार्यालयातच आता कंत्राटी कामगार नेमण्याचादेखील निर्णय़ शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला आहे...
या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या २० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक आणि होरपळ थांबवा अशा आक्रोश उभा करण्याची गरजआहे.
.. केरळमध्ये अशा प्रकारच्या खाजगीकरणाला नाकारून शासकीय-निमशासकीय-सहकारी सर्व संस्थांतील सेवक भरती ही केवळ केरळ लोकसेवा आयोगाकडूनच होते... त्यामुळे तेथे कोणताही भ्रष्टाचार नाही... हाच आदर्श महाराष्ट्राने घ्यावा... आणि केरळ प्रमाणेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला भरपूर निधी आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा.. आयोगावरील सदस्यांची पूर्ण नेमणूक करावी...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: