‘चिपको’ | Chipko movement |
Автор: Rupak Sane
Загружено: 2025-03-13
Просмотров: 491
हे होतं ‘चिपको’ आंदोलन
१९७० च्या दशकात अत्ताच्या उत्तराखंड, त्या वेळच्या उत्तर प्रदेशातील हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये हे आंदोलन सुरू झाले.
जंगलांचे रक्षण करण्यासाठी अहिंसक पद्धतीने प्रतिकार करून व्यापार आणि उद्योगासाठी जंगलांच्या वाढत्या विनाशाच्या विरुद्धची ही महत्त्वपूर्ण पर्यावरणीय चळवळ मानली गेलीये.
या आंदोलनाने मोठ स्वरूप घेतलं ते एप्रिल १९७३ च्या दशकात.
अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावात ‘चिपको’ आंदोलनाची सुरुवात झाली.
इथल्या जंगलाचा एक भूभाग क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या एका कंपनीला देण्यात आला होता. जंगलात तब्बल अडीच हजार झाडांचा लिलाव त्यावेळी करण्यात आला
त्याच वेळी ‘दाशैली ग्राम स्वराज्य संघ’ या स्थानिक संस्थेने शेतीची अवजारे तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे याच जंगलात वृक्षतोड करण्याची परवानगी मागितली होती, ती मात्र नाकारली गेली होती.
साहजिकच व्यापारी कंपनीला दिलेल्या परवानगीला स्थानिक लोकांनी विरोध करून त्यातून ‘चिपको’ आंदोलन उभे राहिले.
गौरादेवी या महिलेने पुढाकार घेऊन गावागावांत फिरून स्त्रियांना एकत्र आणले आणि जंगलात हे ‘चिपको’ आंदोलन सुरू केले. त्यात गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी यांसारख्या स्त्रिया हिरिरीने उतरल्या. .
गावातील आंदोलकांनी विरोध केला, तरीही लिलाव झालाच.
ठेकेदारांना लोकांच्या विरोधाची कल्पना नव्हती.
त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांची जुनी देणी देण्याच्या निमित्ताने चामोलीत बोलावून घेतले. आणि
त्यांच्या गाफीलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी गुपचूप रेनीच्या जंगलात मजूर पाठविले.
एका छोट्याने झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या मजुरांना पाहिलं आणि धावत जाऊन गावात ही खबर दिली.
पण, गावात फक्त १५-२० स्त्रिया आणि काही छोटी मुले होती.
पुरुष मंडळींना निरोप कळवून ते परत येईपर्यंत दोन-तीन दिवस लागणार होते तोपर्यंत जंगलतोड अटळ होती.
हे लक्षात येताच गावातील महिला आपल्या मुलांसह जंगलात आल्या. महिलांसह सगळी लहान मुलं झाडाला चिकटून चिपकुन उभी राहिली. .‘पेड कटने नही देंगे’ च्या घोषणा देत सर्वांनी तोड होणाऱ्या वृक्षाला कवटाळून ठेवले. घट्ट मिठया मारल्या. स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबलं.
ठेकेदारांनी स्त्रियांना विवस्त्र करण्याच्या धमक्या दिल्या. पण, एकीनीही ठेकेदारांच्या धमक्यांना भीक घातली नाही.
शेवटी मजूरांनी माघार घेतली.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात झालेलं हे पहिलंच अनोखं आंदोलन होतं.
पुढे हे आंदोलन ‘चिपको’ आंदोलन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 'हगिंग मूव्हमेंट' असेही त्याला नाव पडलं.
सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट्ट यांनी ह्या आंदोलनाला देशभर पसरवून एक संघटित अभियान बनवले. त्यांचा संदेश राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचवला. ग्रामीण लोकांपर्यंत त्यांचे संदेश पोहोचवण्यासाठी, चिपको कार्यकर्त्यांनी अनेकदा लोकगीतांचा वापर केला. चळवळ जसजशी वाढत गेली तसतसे काही प्रभावशाली नेते त्यांच्या गटातून उदयास आले आणि त्यांनी .
यातून शेकडो झाडांची जंगले, हजारो पक्षी, प्राण्यांची निवासस्थाने वाचली.
अनेक पर्यावरण बचाओ चळवळींना यातून प्रेरणा मिळाली.
दि.२१ मे २०२१ रोजी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोना ने निधन झाले.
ही जंगलं हा निसर्गाने आपल्याला दिलेला वारसा आहे,
त्यांचा आदर आणि जतन आपणच केलं पाहिजे.
ही जंगलं म्हणजे आपल्याला काही काळाकरिता मिळालेली भेट आहे.
आपल्या पश्चात ही भेट आपण होती त्या अवस्थेत किंबहुना त्यात वाढ करून
एक पवित्र मालमत्ता म्हणून आपण पुढच्या पिढीकडे सुपूर्द केली पाहिजेत.
माझ्या चॅनलला subscribe, like, share करा.
मोबाईल - 9420444969
[email protected]
/ @rupaksane
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: