पौष्टिक गुळ खोबरे शेंगदाणा लाडू | Healthy & Immunity Booster Ladoo | सुका खोबरे लाडू | Coconut Ladu
Автор: AnjaliS Swayampakghar
Загружено: 2025-12-03
Просмотров: 183
पौष्टिक गुळ खोबरे शेंगदाणा लाडू | Healthy & Immunity Booster Ladoo | सुका खोबरे लाडू | Coconut Ladu
तुम्हाला जर काही खास बनवायचं असेल तर हा एक उत्कृष्ट पदार्थ आहे या पदार्थाची चव सुगंध आणि यातील सामग्री यामध्ये तुम्हाला हा पदार्थ नक्कीच आवडेल यामध्ये वापरले जाणारे पदार्थ आणि खोबरे यांचा संगम याला खास बनवतो.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडू बनवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती मिळेल चला तर मग सुरुवात करूया...
चला तर मग जाणून घेऊया लाडू बनवण्यासाठी लागणारी साहित्य
1. एक वाटी किसलेला गूळ
2. अर्धा वाटी शेंगदाणे
3. पाव किलो सुके खोबरे
4. दहा ते बारा बदाम
5. दहा ते बारा काजू
6. दहा ग्रॅम मनुके
7. एक चमचा वेलची पावडर
8. एक चमचा खसखस
9. साजूक तूप
कृती :
• सर्वप्रथम खोबरे बारीक किसून घ्यावे.
• सर्व ड्रायफ्रूट्स बारीक चिरून घ्यावेत.
• एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स आणि मनुके चांगले भाजून घ्यावेत.
• ड्रायफ्रूट्स भाजून काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये खोबरे चांगल्या पद्धतीने भाजून घ्यावे.
• आता सर्व भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे एका मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत.
• आता एका कढईमध्ये थोडसं तूप घ्यावे त्याच्यामध्ये गूळ चांगला वितळवून घ्यावा त्या वितळलेल्या गुळामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स आणि खोबरे टाकून चांगले एकजीव परतून घ्यावे.
• सर्व मिक्स केलेले मिश्रण जरा वेळासाठी थंड होऊ द्यावे
थोडेसे थंड झाल्यानंतर त्याला आपण आता त्याचे लाडू बनवायला घेऊयात.
• अशा पद्धतीने तयार आहे आपली पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडू.
रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता.
#sweet #laddu #laddugopal #coconut #recipe #indianfood #anjalisswayampakghar #winterspecial #dryfruits
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: