सह्याद्रीच्या गिरीपुत्रांचा हा कोकणदिवा..! पानशेत घोळ मार्गे रायगडावरती पहारा देणारा गिरीदुर्ग
Автор: Nagar Trekkers
Загружено: 2025-10-10
Просмотров: 214
सह्याद्रीच्या गिरीपुत्रांचा हा कोकणदिवा..!
सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून एखाद्या ज्योतीच्या आकाराचे हे शिखर लवलवत उठावले आहे. खाली कोकणातून तळातून निरखल्यास हा आकार स्पष्ट जाणवतो.रायगडाचे एक नाव आहे नंदादीप. राजघरातील रायगड हा नंदादीप असेल तर सह्याद्रीच्या गिरीपुत्रांचा हा कोकणदिवा
.
कावळ्या घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकणदिव्याची उभारणी झाली. रायगडाच्या परिसरात असलेल्या वाटापैकी सर्वात जवळची वाट म्हणजे कावळ्या घाट. सहाजिकच या घाटावर नजर ठेवणारा कोकणदिव्याला निश्चित महत्व असणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी उपदुर्गांची साखळी तयार केली व जुने गड मजबुत केले. या किल्ल्यांच्या साखळीमुळे स्वराज्यावर चालून येणाऱ्या शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण झाले होते. या उपदुर्गांपैकी एक असलेला कोकणदिवा रायगडचा संरक्षक दुर्ग म्हणुन रायगडाच्या उत्तर दिशेला पुणे आणि रायगड जिल्ह्य़ाच्या सीमेवर उभा आहे
.
कोकणदिव्याच्या देशाकडच्या बाजुला पायथ्याचे गाव आहे, गारजाईवाडी. मात्र आपली गाडी असेल तर पक्का डांबरी रस्ता घोळ या गावापर्यंतच आहे. घोळ गावं पानशेतपासुन सुमारे तीस कि.मी.वर आहे
.
दुसरी वाट सांदोशी मधुन आहे. महाडमार्गे सांदोशी गाव गाठायचे.
.
माथ्याचे क्षेत्रफळ जेमतेमच आहे. मात्र ईथून जे दृष्य दिसते, त्याला तोड नाही.वर्णनासाठी शब्द तोकडे पडावेत.
.
शिवाजी राजांच्या निधनानंतर आणि शंभुराजांच्या दुर्दैवी शेवटानंतर औरंगजेबाने आपला मोहरा राजधानी रायगडाकडे वळवला. गडावर राजाराज महाराज आणि येसुबाई राणिसाहेब होत्या. ईदीकतखानाने रायगडाभोवती वेढ्याचा फास आवळला. मात्र उत्तरेच्या बाजुला कुमक कमी असल्यामुळे शहाबुद्दीनखानाने कावळ्या घाटाने सैन्य उतरवून वेढा पक्का करायचे ठरविले. हि खबर लागताच २५ मार्च १६८९ या दिवशी गोंदाजी जगताप आणि सरकले नाईक यांनी शहाबुद्दीन खानाचे तीनशे सैन्य याच रणक्षेत्री कापून काढले. सांदोशी गावच्या या वीरपुत्रांनी अक्षरशः चार हातांनी हि खिंड लढवली. हा ईतिहास किती जणांना माहिती असतो? पावनखिंड आणि उंबरखिंडीसारखीच हि आणखी एक वीरभुमी कावल्या-बावल्या खिंड ! या प्रतिकारामुळे मोघल सैन्य कावळ्या घाटाने खाली उतरु शकले नाही, आणि रायगडाचा वेढा कमकुवत राहिला. परिणामी राजाराम महाराजाना रायगडाहुन सुरक्षित जिंजीला जाता आले
.
#kokandiwa #kokandiva #nagartrekkers #kavalyaghat
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: