पहिल्या शिक्षिका, समाजक्रांतीच्या जननीसावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.3 जानेवारी 2026”
Автор: ZP Teacher Sachin Sir
Загружено: 2026-01-02
Просмотров: 43
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पखोरा येथे दि. ३ जानेवारी २०२६ रोजी थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व, स्त्री-शिक्षणाची जाणीव तसेच सामाजिक समतेचे मूल्य रुजविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंदांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेला संघर्ष, समाजातील अज्ञान व अन्यायाविरुद्ध दिलेली झुंज आणि शिक्षणाविषयीची त्यांची अपार तळमळ याविषयी सविस्तर माहिती दिली.
या जयंती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले प्रगती खंडागळे व राधिका पाटील या विद्यार्थिनींचे नाट्यकरण सादरीकरण. या दोन्ही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची अतिशय सुरेख वेशभूषा साकारत त्यांच्या जीवनातील संघर्षमय प्रवास प्रभावीपणे सादर केला. नाट्यकरणातून स्त्री शिक्षणासाठी समाजाकडून मिळालेला विरोध, अपमानास्पद वागणूक आणि तरीही न डगमगता सुरू ठेवलेले शिक्षणकार्य याचे हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थी भारावून गेले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा व समाजाचा विकास करण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरा येथील सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम प्रेरणादायी व सामाजिक जाणीव जागृत करणारा ठरला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: