|| श्री गुरुपूजन - गुरुपौर्णिमा कृतज्ञता सोहळा || जुलै 2025 भाग -2 🙏🚩
Автор: vasudhaiva kutumbakam
Загружено: 2025-07-11
Просмотров: 1628
ll श्री गुरुपौर्णिमा सोहळा ll
10 जुलै 2025, वार गुरुवार
स्वामी हो नमस्कार 🙏🚩
रोज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण सर्वजण वेगवेगळ्या विषयात, क्षेत्रात दिवसभर काम करत असतो ते काम करत असताना आपल्याला कधी आई-वडील, भाऊ बहीण, मित्र मैत्रीण, शिक्षक, सहकारी, समाज यांच्यापैकी कोणाचे तरी सतत गुरु म्हणून मार्गदर्शन घ्यावे लागते पण हे सर्व काही व्यवहारिक झाले.
*परंतु खऱ्या अर्थाने गुरु हा आपल्याला आपले जीवन योग्य दिशेने परिपूर्ण होण्यासाठी आपल्याला सतत ...
नित्य नवा पाठ भक्तीचा मनाला,
पाही दत्तलीला चिंतनाने ll
अशा स्वरूपात मार्गदर्शन करत असतो आणि हे मार्गदर्शन त्याचे आपल्याला स्वतःची ओळख करून देत, त्या भगवंत स्वरूप परमात्म्याला ओळखावे* म्हणून आपल्याकडून तो विविध सेवा, उपासना, भक्ती व साधना करून घेत असतो.
आज अशाच सद्गुरूंचे कृतज्ञ पूर्ण स्मरण करून, त्याच्यासाठी आज दिवसभर तो परमात्मा, भगवंत आपल्याकडून आनंदीत व्हावा, व आपण केलेल्या सेवेतून समाधान आणि प्रसन्नता लाभावी व त्याचा कृपेचा वर्षाव सतत आपल्यावर होत रहावा या अनुषंगाने आपण सर्व भक्तगण मिळून हा गुरुपूजनाचा महासोहळा दिवसभर सगुण आणि निर्गुण गुरूंच्या सहवासात श्री गुरुपद्म परिसर पोखरी जळगाव येथे संपन्न करत आहोत.
🌷☘️🌷☘️🌷☘️🌷☘️🌷☘️🌷
🌼 पहाटे 3.00 ते सकाळी 6.00
🌸 श्री स्वामी महाराजांचे अभ्यंग स्नान व चरण पादुका, राजदंड, गोमाता स्नान.
🌸 श्री स्वामी महाराजांचे पंचोपचारपूजन वस्त्र अलंकार परिधान सोहळा.
🌸 श्री वटवृक्ष काष्ट पादुकांचे आपल्या श्रीमस्तकावर ठेवून कृपांकित कृतकृत्य सोहळा.
🌼 सकाळी 6.00 ते 8.00
🌸 अग्निहोत्र व सप्तश्लोकी.
🌸 सकाळी अग्निहोत्रापासून ते संध्याकाळी अग्निहोत्रापर्यंत लापशी प्रसाद वाटप.
🌸 समर्थवाडी परंपरेनुसार संपूर्ण आरती उपासना व धन्य धन्य हो प्रदक्षिणा संपन्न होईल.
🌼 सकाळी 8.30 ते 11.00
🌸 54 कलश पूजन व स्थापना.
🌸 संगीत आराधना, भजन सेवा.
🌸 1008 बेलपत्र व तुळशीपत्र यांची गुरु पादुकांवर अभिषेक व पूजन.
🌸 विविध फळांचा नैवेद्य.
🌼 दुपारी 11.00 ते 3.00
🌸 संपूर्ण आरती उपासना, महानैवेद्य, महाआरती व धन्य धन्य प्रदक्षिणा संपन्न झाली.
🌸 भक्तांसाठी महाप्रसाद.
🌼 संध्याकाळी 4.00 ते 7.00
🌸 श्री गुरु मंत्राचे जप व हवन विधी.
🌸 श्री गुरु पादुकांवर 54 कलश आयुर्वेदिक सहस्रनाम अभिषेक.
🌸 बेलपत्र तुळशी पत्र व सर्व विविध आयुर्वेदक अभिषेक जलाचा काढा.
🌼 संध्याकाळी 7.00 ते रात्री 9.00
🌸 संपूर्ण आरती उपासना व धन्य धन्य हो प्रदक्षिणा संपन्न झाली.
🌸 सर्व नैवेद्य फळांचा फ्रुट सलाड प्रसाद.
🌷☘️🌷☘️🌷☘️🌷☘️🌷☘️🌷
🌷☘️🌷☘️🌷☘️🌷☘️🌷☘️🌷
#swami #samrth #swamisamrth #maharaj #swamisakha #sakha #shreeswamisamarth #viral #गुरुपौर्णिमा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: