Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

ऊस तांबेरा रोग नियंत्रण | usavaril tambera rog | sugarcane rust control

Автор: Krushi Doctor

Загружено: 2023-08-01

Просмотров: 11155

Описание:

✅👨‍🌾नमस्कार शेतकरी मित्रांनो ! 🙏

कृषि डॉक्टर🌽 या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.👍

या चॅनेल वरती तुम्हाला शेती निगडीत सर्व प्रकारचे विडियो पहायला मिळतील, ते देखील तुमच्या मराठी भाषेत. तुम्ही जर एक शेतकरी असाल तर हा चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, कृपया चॅनेल ला Subscribe -▶️ करा शेजारील घंटा 🔔 वरती देखील क्लिक करा.

✅विषय - ऊस तांबेरा रोग नियंत्रण | usavaril tambera rog | sugarcane rust control

✅तांबेरा रोगाची लक्षणे | sugarcane rust symptoms –

1. ऊसाच्या पानावर दिसुन येणारा हा बुरशीजन्य रोग आहे.
2. सुरवातीस बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूला होऊन पानावर लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात.
3. कालांतराने ठिपक्यांची लांबी वाढून त्यांचा रंग लालसर तपकिरी होतो.
4. ठिपक्याच्या भोवती फिक्कट पिवळसर हिरवी कडा तयार होऊन, पानाच्या खालच्या बाजूस ठिपक्याच्या जाग्यावर उंचवटे तयार होतात.
5. असे ठिपके फुटुन नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बीजाणू बाहेर पडतात. तांबेरा ग्रस्त पाने हातावर चोळल्यास बिजाणूची पावडर पडते.
6. हवेद्वारे या बिजाणूंचा प्रसार होऊन रोगाचा मोठ्या प्रमाणात दुय्यम प्रसार होतो.
7. पानावरील ठिपक्यांची संख्या वाढून शेजारील ठिपके एकमेकात मिसळून मोठे ठिपके तयार होतात. या रोगग्रस्त ठिपक्यातील पेशी मरुन जाऊन पाने करपलेली दिसुन येतात.
8. प्रकाश संश्लेषण क्रियेत व्यत्यय आल्याने ऊसाचे उत्पादन घटते.

✅तांबेरा रोगाचा प्रसार | sugarcane rust spread –

1. ऊसाच्या पानावर पावसाच्या अथवा दवाच्या स्वरूपात असलेले पाणी प्रामुख्याने रोगवाढीसाठी महत्वाचे व अनुकुल घटक आहे.
2. पानावर ओलसरपणा असताना बीजाणू रुजुन बुरशी तयार होते.
3. ही बुरशी पानांच्या आंतरभागात प्रवेश करुन रोग निर्मिती करते. पानामध्ये रोगनिर्मिती प्रक्रिया सुरु झाल्यापासुन 3 ते 4 दिवसात पानावर रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येतो.
4. प्रामुख्याने या रोगाचा दुय्यम प्रसार हवेमार्फत व पाण्यामार्फत होतो.
5. तसेच या रोगाचा प्रसार बेण्यामार्फत अगदी कमी प्रमाणात होतो.
6. काही ठिकाणी मान्सुनचा पाऊस संपल्यानंतर पानावर आढळणार्‍या रोगांचा प्रार्दुभाव कमी होत गेलेला आढळून येतो.

✅तांबेरा रोगाच्या प्रसारासाठी पोशाक वातावरण | Favorable condition for rust in sugarcane –

1. जुलै ते सप्टेंबर पर्यंत असण्यार्‍या मान्सुन पावसामुळे वाढणारी हवेतील सापेक्ष आर्द्रता साधारण 80-90%,
ढगाळ उष्ण व दमट वातावरण,वाहणारे वारे आणि सकाळचे धुके व पडणारे दव
2. बळी पडणार्‍या रुंद पानाच्या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड
3. नत्रयुक्त खतांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर
4. ऊस पिकाच्या मुख्य वाढीचा काळ (3-7 महिन्याचा ऊस)
5. ऊशीरा एप्रिल ते मे महिन्यात व योग्य निचरा न होणार्‍या जमिनीत झालेली ऊस लागवड
6. खोडवा पिकात रोगाची तीव्रता लागणीच्या पिकापेक्षा जास्त दिसून येते.
7. सखल भागातील पाणी साचणे.

✅तांबेरा रोगाचे नियंत्रण | sugarcane rust control –

1. मान्सून हंगामामध्ये रोगाच्या प्रादुर्भाव याबाबत ऊस पिकाचे सर्वेक्षण अथवा पाहणी करुन प्रतिबंधक शिफारसीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
2 .जमिनीत पुनर्लागवड करावयाची असल्यास पूर्वी तुटून गेलेल्या उसाचे अवशेष गोळा करुन त्यांचा नायनाट करावा.
3. ऊसातील रोगग्रस्त पाने काढुन नष्ट करावी.
4. निरोगी बेणे मळ्यातील रोगमुक्त बेणे लागवडीसाठी वापरावे.
5. रोग प्रतिकारक्षम जाती निवडून त्यांची लागवड करावी. (को 86032)
6. योग्य निचरा होणार्‍या जमिनीत ऊस लागवड करावी.
7. लागवडीसाठी रुंद सरी किंवा पट्टा पध्दतीचा अवलंब केल्यास ऊसामध्ये सूर्यप्रकाश व हवेचे प्रमाण वाढून रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
8. नत्राची मात्रा शिफारशीनुसार द्यावी. जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
9. पावसाळ्यात जास्त काळ पाणी साचलेल्या ऊस भागातील पाण्याचा निचरा करावा.
10. पानांवरील तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब (अबिक, सिजेंटा )अथवा कॉपर ऑक्सीक्लोराईड (धानुकोप, धानुका ) यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक 0.3 टक्के – 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन 15 दिवसाच्या अंतराने स्टिकरचा वापर करुन 2-3 फवारण्या कराव्यात.
11. ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर नियंत्रणासाठी 3 ग्रॅम/लि.पाणी मॅन्कोझेब (अबिक, सिजेंटा ) किंवा टेबुकोन्याझोल (फोलिकुर, बायर ) 1 मिली प्रति लिटर किंवा प्रोपिनेब (अंट्रॅकॉल, बायर ) 2.5 ग्रॅम/लि.पाण्यामध्ये मिसळून 10-15 दिवसांच्या अंतराने स्टिकरचा वापर करुन 2-3 फवारण्या कराव्यात.
12. सामूहिक पद्धतीने रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना अवलंबन करावे.

✅संपर्क -

📱What's App:- 9168911489 ☎️
📱Mail id:- st89114.ack@gmail

✅आमचे इतर सोशल मीडिया अकाऊंट -

1️⃣Linked In -   / krushidoctor  
2️⃣Twitter -   / krushidoctor  
3️⃣Website - https://krushidoctor.com/
4️⃣Youtube Marathi -    / krushidoctor  
5️⃣Facebook -   / krushidoctorofficial  
6️⃣Instagram -   / krushi_doctor_official  
7️⃣Youtube Hindi -    / @krushidoctorhindi  

#agriculture #krushidoctor #farming #crop #sheti #krushidoctorsuryakant

ऊस तांबेरा रोग नियंत्रण | usavaril tambera rog | sugarcane rust control

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

ऊस लोळणे। Sugarcane Falling | ऊस पडणे – कारणे, नुकसान आणि उपाय #krushidoctor #sheti #sugarcane

ऊस लोळणे। Sugarcane Falling | ऊस पडणे – कारणे, नुकसान आणि उपाय #krushidoctor #sheti #sugarcane

👍

👍"उसाचा तांबेरा 100%घालवा::फक्त एकाच फवाऱ्यातून"👌

КТО УБИЛ СССР? ЕЛЬЦИН РАСКРЫЛ ПРАВДУ, КОТОРУЮ СКРЫВАЛИ 35 ЛЕТ!

КТО УБИЛ СССР? ЕЛЬЦИН РАСКРЫЛ ПРАВДУ, КОТОРУЮ СКРЫВАЛИ 35 ЛЕТ!

ऊस गवताळ वाढ नियंत्रण | us gawtal wadh | grassy shoot disease of sugarcane | #sugarcane #us

ऊस गवताळ वाढ नियंत्रण | us gawtal wadh | grassy shoot disease of sugarcane | #sugarcane #us

जीवामृत शेती पद्धतीतून 5 ते 6 खोडवे | जैवक पद्धतीने मागील दहा वर्षापासून शाश्वत ऊस शेती झाली शक्य

जीवामृत शेती पद्धतीतून 5 ते 6 खोडवे | जैवक पद्धतीने मागील दहा वर्षापासून शाश्वत ऊस शेती झाली शक्य

एका एकरात 150+ टन ऊस! जाणून घ्या नाना ऊस तंत्रज्ञानाचं रहस्य |कमी पाणी, जास्त उत्पादन! #sugarcane

एका एकरात 150+ टन ऊस! जाणून घ्या नाना ऊस तंत्रज्ञानाचं रहस्य |कमी पाणी, जास्त उत्पादन! #sugarcane

एकरी 100 टन ऊस उत्पादन | असे केले सुधारित व्यवस्थापन | Sugarcane Farming In Maharashtra

एकरी 100 टन ऊस उत्पादन | असे केले सुधारित व्यवस्थापन | Sugarcane Farming In Maharashtra

ПЛАТОШКИН | Прямая линия: ПОСЛЕСЛОВИЕ

ПЛАТОШКИН | Прямая линия: ПОСЛЕСЛОВИЕ

 बाळेवाडी तालुका करमाळा ऊस पिकाला आलेला जबरदस्त रिझल्ट

बाळेवाडी तालुका करमाळा ऊस पिकाला आलेला जबरदस्त रिझल्ट

ऊस पिक लावन खोडवा रोग किड नियंत्रण। लोकरी मावा व तांबेर नियंत्रण

ऊस पिक लावन खोडवा रोग किड नियंत्रण। लोकरी मावा व तांबेर नियंत्रण

СРОЧНЫЕ НОВОСТИ 24 12 2025

СРОЧНЫЕ НОВОСТИ 24 12 2025

शेतकऱ्याचा ऊस वाढीचा फॉर्म्युला!: १० मिनिटे युक्ती

शेतकऱ्याचा ऊस वाढीचा फॉर्म्युला!: १० मिनिटे युक्ती

ЭТИ Крупы ВОССТАНАВЛИВАЮТ Печень и Омолаживают Организм! Доктор Мясников

ЭТИ Крупы ВОССТАНАВЛИВАЮТ Печень и Омолаживают Организм! Доктор Мясников

एकरी १०० टन उसाचे उत्पादन घेण्याची पहिली पायरी... फक्त ७० पैशात 💸 तयार करा उसाचे रोप 🌱

एकरी १०० टन उसाचे उत्पादन घेण्याची पहिली पायरी... फक्त ७० पैशात 💸 तयार करा उसाचे रोप 🌱

उसावरील तांबेरा तपकिरी ठिपके कशामुळे होतात?? त्यावरील उपाय योजना/Sugarcane Farming

उसावरील तांबेरा तपकिरी ठिपके कशामुळे होतात?? त्यावरील उपाय योजना/Sugarcane Farming

ऊस खत नियोजन 2025 | ऊस खत व्यवस्थापन कसे करावे? us khat niyojan | sugarcane fertilizer #krushidoctor

ऊस खत नियोजन 2025 | ऊस खत व्यवस्थापन कसे करावे? us khat niyojan | sugarcane fertilizer #krushidoctor

11हजारात 80+च्या पुढे उसाचा उतारा,शेतकऱ्याचा पोरगा शास्त्रज्ञ,बनवला बूस्टर डोस,sugarcane,visionvarta

11हजारात 80+च्या पुढे उसाचा उतारा,शेतकऱ्याचा पोरगा शास्त्रज्ञ,बनवला बूस्टर डोस,sugarcane,visionvarta

Вольф Мессинг предсказал 2026 год 6 января

Вольф Мессинг предсказал 2026 год 6 января

माळरानावर एकरी 111 टन ऊस उत्पादन | असे केले सुधारित व्यवस्थापन | Sugarcane Farming In Maharashtra

माळरानावर एकरी 111 टन ऊस उत्पादन | असे केले सुधारित व्यवस्थापन | Sugarcane Farming In Maharashtra

🔥СВИТАН: ВНИМАНИЕ! Обращение Путина ВСЕХ ПОДНЯЛО. Мадяр ВЫНОСИТ РФ: Россия ПЫЛАЕТ. Вот, КУДА ПОПАЛИ

🔥СВИТАН: ВНИМАНИЕ! Обращение Путина ВСЕХ ПОДНЯЛО. Мадяр ВЫНОСИТ РФ: Россия ПЫЛАЕТ. Вот, КУДА ПОПАЛИ

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]