पालक भाजी - | Avishri Marathi Receipe |
Автор: Avishri
Загружено: 2025-12-22
Просмотров: 14
साहित्य:
पालक – १ जुडी (चिरलेला)
कांदा – २ मध्यम (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची – ७–८ (चिरलेली)
लाल तिखट -१ टेबलस्पून
लसूण – ७–८ पाकळ्या (ठेचलेल्या)
ओलं खोबरे-- ४ -५ छोटे तुकडे
जिरे – १/२ टीस्पून
मोहरी – १/२ टीस्पून
हळद – १/४ टीस्पून
मीठ – १/२ टीस्पून ( चवीनुसार )
हिंग -चिमूटभर
तूर डाळ --१/२ वाटी ( १५ मिनिटे भिजवलेली )
तेल – १–२ टेबलस्पून
शेंगदाण्याचे कुट– १ टेबलस्पून
कृती:
पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या. चिरलेला पालक, तूर डाळ आणि हिरवी मिरची कुकरमध्ये घालून तीन शिट्ट्या द्या.
कढईत तेल गरम करून मोहरी टाका.
मोहरी फुटल्यावर जिरे घाला.
त्यात कांदा घालून लालसर रंग होईपर्यंत परतवा.
लसूण , हिरवी मिरची व ओलं खोबरे यांचे वाटण घालून थोडे परतवा.
नंतर हळद व मीठ घालून परतवा. लाल तिखट टाका व एकसारखे हलवून घ्या.
कुकरमध्ये शिजवलेले पालक व डाळ टाका. एकसारखे हलवून घ्या.
झाकण ठेवून 2-3 मिनिटे शिजू द्या.
शेंगदाण्याचे कुट घालून ढवळा. 2-3 मिनिटे शिजू द्या.
सर्व्हिंग:
भाजी तयार! गरमागरम भाकरी , चपाती किंवा भातासोबत छान लागते. 😊
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: