श्री मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर,मायंबा | येथील दर्शन दत्तांपर्यंत पोहोचते |
Автор: Gosht Pravasachi
Загружено: 2022-12-18
Просмотров: 1394589
श्री मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर,मायंबा | येथील दर्शन दत्तांपर्यंत पोहोचते | machindranath | mayamba
🚩या video मध्ये मच्छिंद्रनाथांची जीवन कथा सांगितली आहे.
यात जर काही चुकले असेल तर comment मध्ये नक्की सांगा🚩
📍मच्छिंद्रनाथ समाधी location : -श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर मायंबा सावरगाव
https://maps.app.goo.gl/hFiGzsvz2GJhk...
🚩समाधी कडे जाण्याचा रस्ता 🚩:-
अहमदनगर - पाथर्डी रोडवरून निवडुंगे गावात उतरणे.तेथुन तीन कि.मी अंतरावर मढी येथे यावे.मढीवरून ५ कि.मी अंतरावर पायी जाण्यासाठी मार्ग आहे,किंवा नगर पाथर्डी रोडवर देवराई फाट्यावरून १२ कि.मी अंतरावर मच्छिंद्रनाथ गड आहे.तसेच नगर - चिचोंडी पाटील - सुलेमान देवळा - बीड या मार्गावरूनसुध्दा रस्ता आहे.
नवनाथांचा_महिमा
कानिफनाथ , गोरक्षनाथ , मच्छींद्रनाथ , चरपटीनाथ , भर्तरीनाथ , अडबंगनाथ , जालिंदरनाथ , गहीनीनाथ , रेवननाथ, नागनाथ. ही नावे जरी ऐकली तरी आपल्या समोर उभी राहतात ते घोर तपश्चर्या करणारे , गुरूभक्त , प्रचंड सामर्थ्यवान , शक्तीशाली , विद्वान , तेजस्वी नवनाथांची नऊ रूपे ...
नवनाथांची चरीत्रे वाचताना माणुस अक्षरशः बधीर होवुन हरवुन जातो . कारण बुद्धीला अगम्य अशी ती चरीत्रे आहेत ...
"" त्यांचे जन्म , कर्तृत्व , संजिवनी मंत्र , शाबरी विद्या , चिमटा , झोळी , भस्म ""
अतीशय गुढ व अद्भुत ...
भुत , पिशाच्च , देव , दानव , राक्षस किन्नर , जिवात्मे , मृतात्मे , प्रेतात्मे सर्वांना पराभुत करून तिन्ही लोकांत अधीराज्य व प्रभुत्व प्रस्थापीत करणा-या नवनाथांचे वर्णन करणे अशक्य आहे ...
जो पर्यंत नवनाथ पृथ्वीवर प्रत्यक्ष अवतारात होते . तो पर्यंत समस्त इंद्रभुवन धास्तावुन गेले होते . कारण नवनाथांचा देवांवर कोप झाला तर मग कोणाचीच धडगत नाही ...
प्रत्यक्ष महाबली हनुमानाला सुद्धा जिवनात पहील्यांदाच नाथपंथीय योग्या समोर युद्धात पराभव पत्कारावा लागला ...
इतके प्रचंड सामर्थ्य शाली होते ही नाथ पंथीय योगी ...
टाच मारील तेथे पाणी काढील . ह्या वाक्याचे परीपुर्ण उदाहरण म्हणजे नवनाथ ...
पण इतके असुनही नवनाथ घमेंडी , अहंकारी , गर्वीष्ट नव्हते तर ... गुरूभक्त , सदाचारी , प्रेमळ व चारीत्र्य संपन्न होते . म्हणुनच त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा आजही भारतीय खंडात गायली जाते .
"" मन करे सो कायदा "" अशी स्थिती असुनही नाथांनी कधिच चुकुनही त्याचा गैरवापर केला नाही ...
👉 मृत्युचे भय नाही ... कारण यमात इतकी शक्ती नव्हती की नाथांचे प्राण घेवु शकेल ...
👉 पराभवाचे भय नाही . कारण ... नाथांना आव्हान देण्याची हिम्मत करणार कोण ... ???
देवांना सिंहासनाची भिती , भुत - प्रेतांना भस्म व मंत्रांची भिती , राक्षसांना भयंकर संहाराची भिती व सामान्य मणुष्यांचा प्रश्नच नाही . एका मंतरलेल्या भस्माच्या चिमीटीने सकळ राज्य पालथे घालण्याची ताकद ...
तरीही नाथांनी असे केले नाही . ते आयुष्यभर नितीने व धर्माने वागले . व त्यांनी जिवनभर तळागाळातील सर्वसामान्य लोकांचा विचार करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात व त्यांना स्वयंपुर्ण बनवण्यात आयुष्य वेचले ...
गोरखपुर येथे गोरक्षनाथांचा भव्य नाथपंथीय दिक्षा आश्रम आहे .
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गर्भगीरी पर्वत रांगेत मढी येथे कानिफनाथ व सावरगाव येथे मच्छींद्रनाथांची समाधी आहे . जवळच गहीनीनाथांची समाधी आहे . विटे गावात रेवननाथ , वडवाल गावी नागनाथ यांची समाधी आहे ...
आपल्या भाग्याने ...
अडबंगनाथ , चर्पटीनाथ , भर्तरीनाथ अजुनही वायुतत्वात अदृष्य पणे भ्रमण करत आहेत . म्हणजे ते अजुनही पृथ्वीवर त्याच रूपात व अवतारात आहेत . पण अदृष्य रूपात आहेत .
नाथांची कठोर साधना व उपासना करणा-यांना नाथांचे प्रत्यक्ष रूप बघण्याचे भाग्य मिळते ...
असे हे नवनाथ व त्यांचे नाथपंथीय शिष्य म्हणजे जणु एक अद्भुत गुढ रहस्यच
#navnath
#machindranath
#madhi
#kanifnath
#mayaba
#मच्छिंद्रनाथ
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: