कोकणात सापडला अजून एक कातळशिल्पांचा खजिना ।50 पेक्षा जास्त अश्मयुगीन कातळखोद शिल्पे सापडली
Автор: Sanchit Thakur Vlogs
Загружено: 2022-06-11
Просмотров: 7449
कोकणात सापडला अजून एक कातळशिल्पांचा खजिना ।50 पेक्षा जास्त अश्मयुगीन कातळखोद शिल्पे सापडली । धनगरवाडी - खोटले, मालवण
#explore
पूर्वेस उंच पसरलेल्या सह्याद्री पर्वतरांगा आणि पश्चिमेस अथांग अरबी समुद्र या दरम्यानच्या पट्टीला भौगोलिकदृष्ट्या कोकण म्हणतात. प्राचीन काळी याचे क्षेत्र अगदी भारताचे दक्षिण टोक असलेल्या केरळ पर्यंत असावे, परंतु सध्या मात्र उत्तरेकडे तापी नदी ते दक्षिणेकडे गोमंतक प्रदेश अशा किनारी भागास कोकण असे म्हटले जाते. या निसर्गरम्य भागाला प्राचीन तसेच अश्मयुगीन इतिहास आहे.अश्मयुगीन हा शब्द आला की कातळशिल्प हा शब्द नक्की येतो. कटाळशिल्पे ही आपल्या सर्वांसाठी पूर्वजांची देणं म्हणावी लागेल,आता कोकणातील अनेक गावांमध्ये कातळशिल्पे सापडत आहेत.प्राग् ऐतिहासिक काळातील सांस्कृृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे महत्त्व विशेष आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे गूढ आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना राॅक आर्ट (Rock Art)किंवा पेट्रोग्लिफ्स(petroglyphs)या नावाने ओळखले जाते. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणातच पाहण्यास मिळतात.
Petrohlyphs किंवा Geoglyphs म्हणून ओळखली जाणारी कातळशिल्पे म्हणजेच कातळ खोद चित्रे म्हणजे कोकणातल्या कातळावर साकारलेल्या भव्य चित्राकृती. या अनेक चित्राकृतींमधून मानवी संस्कृतीची दृश्यरूप जडणघडण झालेली पाहायला मिळते. या चित्राकृतींची सुरवात आदिमानव काळापासून झालेली दिसून येते. आदिमानवाने फारसे संस्कार न करता रेखाकृती साकारल्या. तरीदेखील त्यात खूप मोठा आशय विषय सामावलेला आहे. या रेखाकृती साकारणारे कोण आणि कुठले, त्यांचा कालखंड कोणता आणि मुळात ह्या रेखाकृती करण्यामागची त्यांची मानसिकता नेमकी काय, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
मालवण तालुक्यातील खोटले गावातही आता 50 पेक्षा अधिक कटाळशिल्पे सापडली आहे .कसाल वरून 10km च्या अंतरावर खोटले गाव आहे त्याच्या सड्यावर धनगरवाडी च्या नजीकच्या परिसरात ही कटाळशिल्पे सापडली आहेत . सतीश ललीत सर हे कित्येक वर्षे या कातळशिल्प संदर्भात संशोधन करत आहेत.आणि त्यांनीच ही कातळशिल्पे जगासमोर आणली आहेत.हजारोंवर्षे ही कटाळशिल्पे या सड्यावर होती पण तेवढी कोणाला माहीत नव्हती. पण आता या कटाळशिल्पांवर प्रकाश ललित सर आणि त्यांच्या टीमने टाकला आहे . 37 कटाळशिल्पे त्यांना सापडली त्यांनंतर जेव्हा मी भेट दिली तेव्हा मला अजून 13 गे 15 कटाळशिल्पे सापडली.ही सर्व मिळून 50पेक्षा अधिक कातळशिल्प इकडे आहेत आणि अजूनही सापडू शकत असा दावा तिकडच्या नारायण मोडक तसेच बाकीच्या गावकऱ्यांनी केला आहे
don't forget to share and subscribe ..☺️💐
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
SnapChat -
/ sanchit_vlog
Telegram -
https://t.me/Sanchit_Thakur_Vlogs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: