वाडा येथे मोफत शैक्षणिक कागदपत्रे काढणी शिबिर उत्साहात पार पडले
Автор: Jan Sanvad News Pune
Загружено: 2025-08-31
Просмотров: 408
#jansanvadnewspune, #जनसंवादन्यूजपुणे,
#graminnews, #khednews, #punenews, #ruralnews, #viralnews, #kharpud, #ruralfarmer, #wadanews, #puneruralnews, #kudebk, #rajgurunagar, #bhimashankar, #khedchakan, #yojaksanstha, #karmvirbhauraopatil, #mofatshibir, #samaveshakfoundation, #actionforimpact, #vadastudents, #impdocuments
शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५
वाडा - खेड - पुणे
Headline -
वाडा येथे मोफत शैक्षणिक कागदपत्रे काढणी शिबिर उत्साहात पार पडले
योजक संस्था व समावेश फाउंडेशन – Action for Impact यांचा सामाजिक उपक्रम
ग्रामपंचायत वाडा व कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय यांचे सहकार्य
शिबिरात ६३ विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे सरकारी पोर्टलवर नोंदविण्यात आली
वाडा (ता. खेड) येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी योजक संस्था व समावेश फाउंडेशन – Action for Impact यांच्या वतीने तसेच ग्रामपंचायत वाडा यांच्या सहकार्याने शैक्षणिक कागदपत्रे काढणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार सर व वाडा ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच रुपालीताई मोरे यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मनोगतात अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची अडचण भेडसावणार नाही आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला गती मिळेल असे सांगितले.
योजक संस्थेकडून सन्माननीय स्वप्निल हुंबरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, मनीषाताई कड, ईश्वर कांबळे, चांदणीताई वाघचौरे, सारिकाताई ओव्हाळ, निकिताताई पावडे हे संस्थेचे समन्वयक उपस्थित होते. तर सहयोग फाउंडेशन कडून अक्षय काळोखे व विशाल साबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे वाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते संदेश सूर्यवंशी यांचेही सहकार्य लाभले.
या शिबिराद्वारे सुमारे ६३ विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे व्यवस्थितरीत्या सरकारी पोर्टलवर नोंदविण्यात आली. पालकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले व अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तहसील च्या ठिकाणी जाण्याचा त्रास वाचल्याचे पालकांनी सांगितले.
या शिबिरात विद्यार्थी व पालकांना, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, डोमासाईल प्रमाणपत्र यांसारख्या विविध शैक्षणिक प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. यामुळे पुढील काळात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया व शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.
संपूर्ण वाडा ग्रामपंचायत तर्फे या उपक्रमासाठी योजक संस्था व समावेश फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच अशा उपक्रमांचे आयोजन नियमितपणे व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
प्रतिनिधी : डॉ. देवेंद्र ओव्हाळ (जन संवाद न्यूज पुणे) - 9921271621
विडिओ एडिटिंग : सुनील वाघचौरे - 8104710017
JAN SANVAD NEWS PUNE I जन संवाद न्यूज पुणे
सामाजिक I शैक्षणिक I राजकीय I सांस्कृतिक I आरोग्य I कृषी
बातम्या जाहिराती व अधिक माहितीसाठी संपर्क:
8104710017 I 9921271621
Email : [email protected]
#jansanvadnewspune, #जनसंवादन्यूजपुणे
आपल्या विभागातील बातम्या पाहण्यासाठी
'जन संवाद न्यूज पुणे' या YouTube चॅनेलला
Subscribe l Like l Comment l Share करा!
News Theme 2 by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. https://creativecommons.org/licenses/...
Artist: http://audionautix.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: