माननीय लोकसभा खासदार श्री.सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी ‘निरसन आणि सुधारणा कायदा, २०२५’..
Автор: Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Загружено: 2025-12-16
Просмотров: 73
माननीय लोकसभा खासदार श्री.सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी ‘निरसन आणि सुधारणा कायदा, २०२५’ वरील चर्चेत सहभाग घेतला. या विधेयकाअंतर्गत ७१ जुन्या कायद्यांचे निरसन आणि चार प्रमुख कायद्यांमध्ये सुधारणा प्रस्तावित असल्याचे त्यांनी नमूद केले. काळानुसार कायद्यांमध्ये बदल आवश्यक असल्याचे मान्य करत असतानाही, सर्व कायदे सरसकट रद्द किंवा सुधारित करण्यास त्यांनी विरोध दर्शविला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रस्ताव त्यांनी उदाहरणादाखल मांडला आणि प्रत्येक निर्णयासाठी ठरावीक कालमर्यादा असावी अशी मागणी केली. तसेच वीज वितरणाच्या वाढत्या खाजगीकरणामुळे रोजगार व जनतेच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करून खाजगीकरणाला मर्यादा घालणाऱ्या कायद्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
स्थानिक नागरिकांना त्यांच्या राज्यातील नोकरी व व्यवसायात प्राधान्य देण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याची मागणी करताना, लोकशाहीत महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये जनतेला विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, सिग्नलवर लहान मुलांना घेऊन भीक मागण्याच्या वाढत्या घटनांबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आणि या सामाजिक समस्येकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे असे आवाहन केले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: