गीत ज्ञानेश्वरी, अभंग क्र. ४ गाई चालल्या वनाप्रती | Geet Dnyaneshwari, Abhanga - Gaayi Chalalya
Автор: Geet Dnyaneshwari
Загружено: 2020-03-15
Просмотров: 749
ज्ञानदेवांच्या अभंग गाथेमध्ये अनेक अभंग असे आहेत कि त्या अभंगांवर एखादी नृत्यनाटीका बसवता येऊ शकते. या अभंगांमध्ये ज्ञानदेवांनी कृष्णाच्या जीवनातील अनेक प्रसंग चितारले आहेत. हे लक्षात आल्यावर, जवळपास वीस वर्षांपूर्वी मी अशा निवडक अभंगांना चाली लावल्या होत्या.
त्यातलाच एक अभंग आम्ही नवीन रंगरूपात सादर केला आहे. परितोषने या अभंगाला एकदम आधुनिक असे संगीत दिले आहे.
"गाई चालल्या वनाप्रती, सवे पेंधा चाले सांगाती", असे या अभंगाचे बोल आहेत. या अभंगाचा शेवट "ज्ञानदेव सवे सवंगडा लाठा, गाई हाकितो गोठणा तटा", असा होतो. याचा अर्थ असा कि कृष्ण आणि पेंद्याबरोबर ज्ञानेश्वर देखील त्यांचा सवंगडी बनून, हातात काठी घेउन गाई हाकीत आहेत. याप्रकारे अतिशय रम्य असे वर्णन पहायला मिळते.
गायी चालिल्या वनाप्रती । सवें पेंधा चाले सांगाती ।। १ ।।
वळि गोवळिया कान्होबा । यमुने पाण्या नेई तुं बा ।। धृ ।।
पांवया छंदे परतल्या गाई । विसरल्या चारा तल्लीन ठाई ।। २ ।।
ज्ञानदेव सवे सवंगडा लाठा । गाई हाकितो गोठणा तटा ।। ३ ।।
Concept, Original Compositions & Music, Singing
Dr. Dinesh Katre, Paritosh Katre, Kirti Katre
गीत ज्ञानेश्वरी : नादचित्रांची रुपडी
संकल्पना, संगीत, गायन
डॉ. दिनेश कात्रे आणि परितोष कात्रे
Contact: [email protected]
Copyright 2020 © All Rights Reserved
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: