दत्तावधूता किती तू श्रमसी | दत्त प्रेमलहरी पद १६७१ | datta premlahari pad 1671 | dattavadhuta
Автор: Bhausaheb Daddikar
Загружено: 2025-07-27
Просмотров: 1396
दत्तावधूता किती तू श्रमसी ।। भक्तांसाठीं निशिदिनीं झुरसी ।। धृ० ।। धांवा न करितां धांवुनी येसी ।। वर न मागतां अभय देसी ।। १ ।। आपुला म्हणवुनी पदीं ठेविसी ।। योगक्षेमाची चिंता वाहसी ॥ २ ॥ भक्त म्हणतां मुक्त करिसी ।। दत्ता बुडविलें निजप्रेमरसीं ।। ३ ।।
हे दत्तावतारी माझ्या सद्गुरू बालमुकुंदा! तू भक्तांसाठी कितीतरी श्रम घेतोस! त्यांच्या कल्याणासाठी किती किती कष्टतोस! की, त्याला सीमा नाही! असा तु आपल्या भक्तांसाठी रात्रंदिवस कष्ट करून झुरतोस ! भक्तांनी तुझा धावां, प्रार्थना कांही न करितांना, तुला हाक न मारिता, भक्तांचे अंतःकरण ओळखून, त्यांच्या अडचणी, संकटे जाणून, ते निवारण करण्यासाठी स्वतःहून त्यांच्या भेटीसाठी धांवतच येतोस! आणि आशीर्वाद अथवा वर न मागतां, त्यांचे मनोगत जाणून, त्याला "पुत्रा भिऊ नकोस! मी तुझे सदैव रक्षण करीतच असतो! तू शांत रहा! असे अभयवचन देतोस. ।। १ ।। त्या आपल्या भक्ताला "तू आतां माझा पुत्र झाला आहेस ! तुझी सर्व काळजी मी घेतली! तू कसलीच चिंता करू नकोस!" असे आपुलकीच्या प्रेम भावनेने बोलून, त्या भक्ताला आपल्या चरणांचा आश्रय देऊन, त्याच्या प्रपंच परमार्थाची सर्व चिंता तू वाहतोस ! असा तू प्रेमळ आहेस ! ।।२ ।। तू एकदाच “हा माझा भक्त आहे" असे म्हटल्यावर, त्याची सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन, त्याला या खोट्या मायापाशांतून सोडवून, आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून देतोस. तू तर, या पंताला आत्मस्वरूपरूपी प्रेमडोहांत बुडवून मला एकरूपच करून टाकिलेस ॥३॥
#दत्तभजन #पंतमहाराजभजन #पंतमहाराजबाळेकुंद्री #pantmaharajbalekundri #pantmaharajbhajan #पंतभजन #दत्तप्रेमलहरी #dattapremlahari #भजन #bhajan #आरती #arti #arati #भक्ति #bhakti #दत्तात्रेय #dattatraya #dattatreya #दत्त #datt #datt #भक्ती
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: