कई बार यूं भी देखा है हे गाणे नाईलाजास्तव मुकेशच्या आवाजात रेकॉर्ड करावे लागले कारण
Автор: Anitta Padhye Production
Загружено: 2025-01-11
Просмотров: 3711
कई बार यूं भी देखा है हे गाणे नाईलाजास्तव मुकेशच्या आवाजात रेकॉर्ड करावे लागले कारण रजनीगंधा शेवटचा भाग#मायाजाल#anittapadhyeproduction
anittapadhye production mayaajaal मायाजाल
भारतीय चित्रपटसॄष्टी. भारतीय जनतेच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आणि अविरत मनोरंजनाचा अविभाज्य झरा. चित्रपटसॄष्टी ही एक मायाजाल आहे. स्वप्न उराशी घेऊन माणसं या दुनियेत प्रवेश करतात. अनेकजण यशस्वी होतात तर बहुसंख्य अपयशी. यशाच्या शिखरावर असणारा स्टार सापशिडीतील खेळासारखा क्षणार्धात जमीनीवर येतो आणि एखादा अज्ञात कलाकार झर्रकन यशस्वी होतो. यशापयशाची काहीच खात्री नाही. मात्र पदरी यश येवो किंवा अपशय , क्वचितच कुणी या मायानगरीपासून दूर जातो. इथे मोठ्या प्रमाणात कामाचा मोबदला मिळतो मात्र मेहनत सुध्दा अतोनात घ्यावी लागते. चित्रपट स्वप्न विकत असतात असं म्हणतात. खरं नसतं , तेही पहाणार्याला खरं वाटावं इतकी मोठी ताकद सिनेमामध्ये असते. स्वत:ला विसरुन दोन- अडीच तास प्रेक्षक त्या नकली दुनियेत रमत असतो. रुपेरी पडद्यावर असंख्य चित्रपटांमध्ये वैविध्यपुर्ण व्यक्तिरेखा साकार करणारे कलाकार प्रत्यक्षात देखील नकली, ते साकार करत असलेल्या व्यक्तीरेखांसारखेच असतात असा बहुसंख्य प्रेक्षकांचा समज असतो. परंतु प्रत्यक्ष आयुष्यात ते कलाकार तसेच असतात असं नाही. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा नट हा केवळ कलाकारच नसतो तर माणूस देखील असतो. सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्याच्या स्वभावाचे सुध्दा चांगले -वाईट पैलू असतात. गुण-दुर्गुण असतात आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांच्या मनामध्ये त्या त्या कलाकांराची जी प्रतिमा असते; प्रत्यक्ष जीवनात सुध्दा ते कलाकार तसेच असतात असं अजिबात नाही. चाळीसहून अधिक वर्ष सिनेपत्रकार व लेखिका म्हणून हिंदी चित्रपटसॄष्टीशी माझा खुप जवळून संबंध आला आहे, इतक्या वर्षांच्या अविरत प्रवासात स्टार्स कलाकारांपासून अनेक सहाय्यक कलाकार, पार्श्वगायक-गायिका, दिग्दर्शक, संगीतकार, निर्माता आदिंशी माझ्या भेटी झाल्या, त्यांच्या मुलाखती घेण्याचा योग आला.कधी चांगले अनुभव आले तर कधी कटू. मात्र कायमच मी या सर्व मंडळींच्या मुखवट्या मागचा कलाकार शोधण्याचा प्रयत्न करत आले आहे. तेच अनुभव मायाजाल मधून मी सिनेरसिकांसह शेयर करत आहे. अर्थात सत्य , खर्याखुर्या पण रंजंक घटना.
anittapadhye production mayaajaal मायाजाल
संकल्पना व सदारकर्त्या :- अनिता पाध्ये
anittapadhye production mayaajaal मायाजाल
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: