अविश्वसनीय पराक्रम,असामान्य शौर्य छावा पहायलाच हवा |Chhaava Box Office Collection | Vicky Kaushal |
Автор: News Tapu
Загружено: 2025-02-16
Просмотров: 709
#chhavatrailer #chhavamovie #chhatrapatishivajimaharaj #chatraptishivajimaharaj #chhatrapatisambhajimaharaj #vickykoushal #rashmikamandanna #chhava #chhaava #chhaavamovie
अविश्वसनीय पराक्रम, असामान्य शौर्य, असलेले एक महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेला बहुचर्चित आणि बहुप्रतिकक्षित छावा हा ऐतिहासिक चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला ९ फेब्रुवारीला म्हणजेच प्रदर्शनापूर्वी ५ दिवस आधी सुरवात झालेली होती. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच चाहत्यांनी वेळ न दवडता आपली लाखो तिकिटे बुक केली होती, तेव्हाच हा सिनेमा कमाईचे रेकॉर्ड तोडेल असे सांगितले जात होते. आणि झालेही तसेच. सध्या ऑनलाईन आणि थिएटर्सच्या तिकिटबारीवर ‘छावा’ चित्रपटावर पैशांचा पाऊस पडतोय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सॅक्निल्क या वेबसाईट च्या मते, संपूर्ण भारतात चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच सुमारे 7.52 कोटी रुपये कमावले होतो. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 31 कोटी रुपयांचा बिजनेस केला, तर दुसऱ्या दिवशी 37 कोटी रुपये कमावल्याचे म्हटले जाते. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालतो आहे असे म्हणावे लागेल. त्यातच आज रविवारी 16 फेब्रुवारीला किमान 40 ते 45 कोटी रुपयांचा बिजनेस हा सिनेमा करेल असे अंदाज बांधले जात आहेत. या सिनेमाने वर्ल्ड वाईड 100 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याची देखील आकडेवारी समोर आली आहे.
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: https://newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: