रामरक्षा ३० | निर्गुण भगवंताची सगुण आराधना: रामप्रिय भरताची प्रेमोपासना अर्थात वंदनभक्ती
Автор: Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
Загружено: 2025-10-25
Просмотров: 5591
रामरक्षा-कवचातील ‘कण्ठं भरतवन्दित:’ अर्थात ‘भरत ज्याला कायम वंदन करतो, असा राम माझ्या कंठाचे रक्षण करो’ ह्या ओळीचे अर्थात भरताच्या स्वभावविशेषाचे अजून काही पैलू सद्गुरु अनिरुद्ध बापू, दि. १६ जून २००६ रोजी केलेल्या रामरक्षेवरील प्रवचनात उलगडून दाखवत आहेत.
‘मायामनुष्यं हरि’ रामावर प्राणांपलीकडे प्रेम असणार्या भरताचे भक्तजीवनातील हे अत्यधिक महत्त्वपूर्ण स्थान विशद करताना सद्गुरु अनिरुद्ध सांगतात की कंठ अर्थात मान हा जसा मस्तक व बाकीचे शरीर ह्यांना जोडणारा दुवा आहे, तेच काम भक्त आणि भगवंत ह्यांच्या बाबतीत भरताचे आहे. ते कसे, हे सद्गुरु बापू इथे विविध उदाहरणांद्वारे समजावून सांगत आहेत.
आम्हाला साध्यासुध्या भक्तांना ‘निर्गुण निराकार परमेश्वर’ वगैरे काही कळत नाही, मग जो ‘दिसत’ नाही, जो ‘कळत’ नाही, अशा परमेश्वराची भक्ती आम्ही करणार तरी कशी? त्याच्याशी अनुसंधान साधणार तरी कसे? सद्गुरु अनिरुद्ध सांगतात की अशा वेळेस ‘भक्तीमध्ये रत’ असणारा भरत आमच्या मदतीला येतो. तो कसा हे स्पष्ट करतानाच ते ठामपणे प्रतिपादित करतात की प्रतिकोपासनेचा मार्ग भक्तांसाठी खुला करून देणार्या भरताचे अनुकरण, हाच सर्वसामान्य भक्तासाठी परमात्मप्राप्तीचा सर्वात श्रेयस्कर मार्ग आहे.
वंदनभक्तीचे महत्त्व सांगताना सद्गुरु अनिरुद्ध बापू आपल्याला रावण आणि बिभीषणामधील फरक समजावून सांगतात. वंदनभक्तीने अशक्यकोटीतील गोष्टी कशा शक्य होऊ शकतात, ते सद्गुरु बापू ह्या दोघांच्या उदाहरणांवरून स्पष्ट करतात व शेवटी ते हेदेखील सांगतात की भरत हाच ‘वंदनभक्तीचा आचार्य’ आहे.
#AniruddhaBapu #Ramraksha #bharatmilap
©℗
----------------------------------
Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c...
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Watch live events - https://www.aniruddha.tv
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
----------------------------------
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: