बदलापूरातले पावसाळी पर्यटन । ताहुलीच्या कुशीतली वाघबीळ गुहा आणि धबधबा | Waghbil Cave & waterfall
Автор: ViGaMi
Загружено: 2025-07-07
Просмотров: 306
विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासाठी ViGaMi या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या घंटीवर 🔔 क्लिक करा जेणेकरुन यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडीओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील.
आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत गर्द वनराईतली ताहुलीच्या कुशीतली वाघबीळ गुहा, त्याच समोरुन वाहणारा आणि वाटेवर लागणारा धबधबा. यासंपूर्ण प्रवासात आपण अनुभवणार आहोत ही निसर्गरम्य सुंदर सफर.
पावसाळ्यातील पर्यटनासाठी विशेष सुचना:
📌 पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील निसर्ग पाहण्यासारखा असतो परंतु अति वेगाच्या पावसाळ्यात येथे जाणे टाळावे.
📌 धबधब्याचे पाणी पावसाळ्यात जोरदार प्रवाहाने वाहत असल्याने पाण्यात उतरणे टाळावे. उंचावरुन उड्या मारुन आपला जीव धोक्यात घालू नये.
📌 येणाऱ्या पर्यटकांनी निसर्गाची हानी होणार नाही यासाठी प्लॅस्टिक किंवा कोणत्याही टाकावू वस्तू इतरत्र न फेकता कचराकुंडीत टाकावे किंवा सोबत न्यावे.
📌 स्थानिक ग्रामस्थ, प्रशासन, हवामान खाते, पोलीस प्रशासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करुन अपघाताचे कारण होवू नये यासाठी खबरदारी म्हणूनच या सुचना आणि बंदी केलेली असते.
📌 स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य घेऊन त्यांच्या पर्यटन विकासाच्या कार्याला चालना द्यावी जेणेकरुन यातून पर्यटन वाढेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
▶️ ViGaMi
✍🏽 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
-------------------------------------------------------------
#vigami #badlapur #nature #marathi #waterfall #sahyadri #hiddenplacesindia #badlapurcity #kokan #marathivlog #marathivlogger
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: