माननीय विधानपरिषद मुख्य प्रतोद व आमदार श्री. शशिकांत शिंदे | महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२५
Автор: Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Загружено: 2025-12-09
Просмотров: 52
माननीय विधानपरिषद मुख्य प्रतोद व आमदार श्री. शशिकांत शिंदे | महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२५ | नागपूर
'महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक २०२५' दरम्यानच्या चर्चेत पक्षाचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद व माननीय आमदार श्री. शशिकांत शिंदे ह्यांनी काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना सुचविल्या. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घसोहित झाल्या. निवडणूक प्रक्रिया सुरु झाली पण काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची ५०% ची मर्यादा ओलांडल्यामुळे तिथल्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. अशी संभ्रावस्था असताना सरकारने स्पष्टता आणावी. ह्या विधेयकाद्वारे उमेदवारांना जातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली जात आहे पण सध्या असलेलं आरक्षणाचं स्वरूप ५०% मर्यादेचं उल्लंघन करणारं असेल तर दाखला सादर करून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांवरही टांगती तलवार असणार आहे तेव्हा आधी निवडणूक, आरक्षण ह्यावर स्पष्ट यावी.
#विधिमंडळ_अधिवेशन #WinterSession2025 #AssemblySession #VidhanParishad#NCPSP #SharadPawar #ShashikantShinde
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: