वाडा येथे कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयात 'स्नेह संमेलन आणि गुरूभेट' कार्यक्रम संपन्न
Автор: Jan Sanvad News Pune
Загружено: 2025-11-11
Просмотров: 1310
#jansanvadnewspune, #जनसंवादन्यूजपुणे,
#graminnews, #khednews, #punenews, #ruralnews, #viralnews, #karmvirvidyalayawada , #shenhsamnelan, #wadanews, #puneruralnews, #kudebk, #rajgurunagar, #bhimashankar, #khedchakan, #gurubhet, #wadaoldschoolmemories, #karmvirbhauraopatil, #wadaeducation, #wadaevent, #teacherstudentgettogether, #gettogether, #ruralwadaschool, #nikamsir, #kakadesir
रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५
वाडा - खेड - पुणे
Headline -
वाडा येथे कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयात 'स्नेह संमेलन आणि गुरूभेट' कार्यक्रम संपन्न
सन १९७५ ते १९९० या कालखंडातील गुरुवर्य व विद्यार्थी-विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित
कार्यक्रमाचे उदघाटक आदरणीय श्री निकम सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री काकडे सर सहपरिवार उपस्थित
नियोजनात बाळासाहेब मेदगे, दिलीप कडलग, दीपक कहाणे, राजेंद्र उबाळे, सुनील आढाव, सविता सोनवणे यांचा सहभाग
दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचविस रोजी नवीन वाडा गावात एक दिमाखदार सोहळा पार पडला. कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयात स्नेह संमेलन आणि गुरूभेट असे शीर्षक लाभलेला कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी जवळ पास पाच महिन्यापासून तयारी चालू केली होती. परंतु पावसाच्या अवकाळी रौद्र रूपाने तो नऊ नोव्हेंबर रोजी वाडा शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला. सन १९७५ ते १९९० या दरम्यान ज्या गुरुवर्यानी या शाळेतील मुलांना घडवले असे गुरू या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तसेच प्राथमिक शाळेत ज्या शिक्षकांनी त्या काळातील विद्यार्थ्यांना ज्ञान अमृत पाजले असे जीवन शिक्षण मंदिर वाडा या शाळेतील गुरुजी आणि मॅडम या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
शाळेच्या प्रवेश द्वारा पासून तर व्यासपीठापर्यंत गुरूंची, विद्यार्थ्यां-विद्यार्थिनींची, एक शोभायात्रा तद्वत पद यात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेत सगळ्यांच्या अंगात पांढरा कुर्ता पायजमा, डोक्यावर भगव्या रंगाचा फेटा, खिशाला भगव्या रंगाचा बॅच तर विद्यार्थिनींनी भारतीय नारीला शोभेल अशा सहावारी साडी व डोक्यावर भगव्या रंगाचा फेटा भगव्या रंगाचा बॅच लावून आल्या होत्या. ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय शिवाजी जय भवानी! कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो! अशा जयघोषात पार पडली. व्यासपीठाच्या दर्शनी भागात सर्व गुरुवर्यांचे कुंकुम तिलक व पाद्यपूजन करण्यात आले. गुरू प्रति प्रेमभाव साकारताना त्यांच्या वर पुष्पवृष्टी करण्यात आली. गुरुवर्य व्यासपीठावर स्थानापन्न झाल्या नंतर शालेय परिपाठ, स्वागतगीत, अध्यक्षीय निवड, असे कार्यक्रम झाले. सदर कार्यक्रमाचे उदघाटक आदरणीय श्री निकम सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री काकडे सर सहपरिवार आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या कल्पना ताई केदारी यांनी केले तर प्रास्ताविक भाषण माजी विद्यार्थी राहिलेले मोहकल शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय संजय नाईकरे सर यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यालयाचे माजी विद्यार्थी, कार्यक्रमाचे केंद्रबिंदू राहिलेले बाळासाहेब मेदगे यांनी केले. या प्रसंगी विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे शिक्षक आदरणीय विलास लोखंडे सर यांनी गुरुवर्यामध्ये काकडे सर, विद्यार्थ्यांमध्ये बाळासाहेब मेदगे, तर विद्यार्थिनीं मध्ये सविता सोनवणे यांच्या सत्काराचा प्रस्ताव मांडला तो सत्कार गुरूंच्या हस्ते शाल आणि पुष्प गुच्छ देऊन केला.
सर्व गुरुवर्य यांना शाळेत शिकवत असलेल्या विषयाचा उल्लेख करून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे सन्माचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांचा त्यांच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती झाल्यामुळे विशेष सत्कार उपस्थित गुरूंच्या हस्ते करण्यात आला. १९८४ या वर्षातील एस एस सी मधील प्रथम क्रमांकाचे मानकरी दत्तात्रय सातव यांचा सत्कार त्यांचेच वर्गशिक्षक राहिलेले आदरणीय निकम सर यांनी केला. या प्रसंगी सिनेकलावंत, टीव्हीस्टार दत्ताभाऊ उबाळे, ब्रह्मांडकट्टा या ऑर्केस्ट्रातील प्रमुख गायक सावनकुमार सुपे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या नियोजनात बाळासाहेब मेदगे, दिलीप कडलग, दीपक कहाणे, राजेंद्र उबाळे, सुनील आढाव, सविता सोनवणे यांनी भाग घेतला होता. अत्यंत नीटनेटके आणि प्रशंसनीय नियोजन झाल्याची ग्वाही गुरुवर्य यांनी दिली. स्नेहभोजन आणि व्यासपीठ सजावट, तिफणवाडीचे सागर कडलग यांनी अफलातून केली होती. स्नेह भोजनानंतर चाळीस वर्षापूर्वी जो कुल्फीवाला कुल्फी विकत होता त्यांना आणण्याचे काम आयोजकांनी केले होते. कुल्फी घेताना सगळ्यांना त्या दिवसाची आठवण झाली. या कार्यक्रमासाठी औदर गावातील सहा विद्यार्थी की जे पहिलीपासून एकत्रच शिकले यांनी विशेष योगदान दिले होते. असा हा रंगतदार कार्यक्रम वाडा शाळेत प्रचंड जल्लोषात साजरा करताना विखुरलेली पाखरे जशी एकत्र येतात तशी सगळी तिथे जुन्या आठवणी काढत आली आणि एक नयनरम्य सोहळा पार पडला.
प्रतिनिधी : डॉ. देवेंद्र ओव्हाळ (जन संवाद न्यूज पुणे) - 9921271621
विडिओ एडिटिंग : सुनील वाघचौरे - 8104710017
JAN SANVAD NEWS PUNE I जन संवाद न्यूज पुणे
सामाजिक I शैक्षणिक I राजकीय I सांस्कृतिक I आरोग्य I कृषी
बातम्या जाहिराती व अधिक माहितीसाठी संपर्क:
8104710017 I 9921271621
Email : [email protected]
#jansanvadnewspune, #जनसंवादन्यूजपुणे
आपल्या विभागातील बातम्या पाहण्यासाठी
'जन संवाद न्यूज पुणे' या YouTube चॅनेलला
Subscribe l Like l Comment l Share करा!
News Theme 2 by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. https://creativecommons.org/licenses/...
Artist: http://audionautix.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: