निस्वार्थ धम्म सेवेची आंतरराष्ट्रीय स्तरावरून घेतलेली नोंद माझ्या धम्मकार्याची खरी ओळख आणि पावती.
Автор: Dr.Siddharth Bhau Hattiambire
Загружено: 2025-03-15
Просмотров: 5
निस्वार्थ धम्म सेवेची आंतरराष्ट्रीय स्तरावरून घेतली गेलेली नोंद माझ्या धम्मकार्याची खरी ओळख आणि पावती आहे..!
===============
माझ्या धम्म बांधवांच्या धम्मबळावर थायलंडच्या भिक्खू संघासोबत दि.17 जानेवारी २०२३ ते 15 फेब्रुवारी २०२३ दरम्यान परभणी ते चैत्यभूमी दादर मुंबई या ऐतिहासिक धम्म पदयात्रे आयोजन करण्यात आले होते. थायलंड येथील विशेष मीडियाने आपल्या धम्मपद यात्रेची विशेष नोंद घेऊन या धम्म पद यात्रेची एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे या फिल्मचा उपयोग थायलंडमधील
'परभणी ते चैत्यभूमी' या धम्म पदयात्रेची थायलंडच्या घराघरात पोहचवली जात आहे. "धम्म त्यांचे रक्षण करतो जे धम्म धारण करतात..!" या तत्त्वानुसार
एमसीडी फाउंडेशन फॉर सस्टेनेबल लीडरशिप डेव्हलपमेंट” थायलंड मधील नामांकित ट्रस्टने आज ही डॉक्युमेंट्री फिल्म मला पाठवली. थाई भाषेत आपल्या धम्मपद यात्रेच्या संपूर्ण इतिवृत्तांत थायलंडमध्ये प्रसारित केला जात आहे. ऐतिहासिक धम्म पदयात्रेच्या भव्य आयोजनामुळे केवळ महाराष्ट्र-भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात धम्ममय चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले याचा मला सार्थ अभिमान वाटतो. माझ्या तमाम बौद्ध बांधवांचे आणि भीमसैनिकांचे पुन:श्च मनःपूर्वक अभिनंदन हार्दिक आभार..!
नमो बुद्धाय..!
सप्रेम जयभीम..!
.......,........................
मा.डॉ.सिद्धार्थभाऊ हत्तीअंबिरे
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस,अनु.जाती विभाग.
#namobuddhay #jaybhim #buddha #buddhism #drbabasahebambedkar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: