गीत ज्ञानेश्वरी, ओवी गीत क्र. ८ - सचंद्र तारांगण लोपे | Geet Dnyaneshwari | Raag Nand
Автор: Geet Dnyaneshwari
Загружено: 2022-01-25
Просмотров: 565
⭐ गीत ज्ञानेश्वरी - सचंद्र तारांगण लोपे ⭐
राग - नंद
मोठ्या अंतरालानंतर गीत ज्ञानेश्वरीमधील नवे गाणे आपणा सर्वांपुढे घेऊन येत आहोत याचा विषेश आनंद वाटतो. माझा मुलगा परितोष हा सध्या अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेल्यामुळे नवीन संगीत रचना करणे शक्य होत नाही. परंतु तो ख्रिसमसच्या सुट्टीत ३ आठवड्यांसाठी घरी येऊ शकला आणि त्यामुळे आणखी एक गाणे पूर्ण करता आले. "सचंद्र तारांगण लोपे" या गाण्याला नंद रागामध्ये चाल लावलेली आहे. परंतु हे गाणे त्यातील हिंदुस्थानी आणि पाश्चिमात्य या भिन्न संगीत प्रकारांच्या मिलापामुळे जास्त श्रवणीय झाले आहे. गीत ज्ञानेश्वरीतील या गाण्यात विभूतियोगामधील निवडक ओव्या खालील प्रमाणे....
अध्याय ११
नाना सूर्यतेजप्रतापें । सचंद्र तारांगण जैसें लोपे ।
तैसीं गिळिलीं विश्वरूपें । प्रपंचरचना ॥ १९० ॥
तेव्हां मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपणपें न सांवरें ।
इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयवरी भरले ॥ १९१ ॥
तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिलें । टकासी टक लागले ।
जैसें मोहनास्त्र घातलें । विचारजातां ॥ १९२ ॥
या ओव्यांचा थोडक्यात अर्थ खालील प्रमाणे ...
भगवद्गीतेतील विभूतियोगात विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर अर्जुनाच्या अवस्थेचे वर्णन या ओव्यांमध्ये आले आहे. ज्या प्रमाणे सूर्य उगवल्यावर त्याच्या प्रकाशामध्ये रात्रीचा अंधार तसेच चंद्र आणि लुकलुकणाऱ्या चांदण्या देखील नाहीश्या होऊन जातात त्या प्रमाणे त्या विश्वरूपाने सृष्टी गिळून टाकली. या रूपकामध्ये सूर्य म्हणजे गुरुकृपा, सूर्यप्रकाश म्हणजे आत्मज्ञान, रात्रीचा अंधार म्हणजे अज्ञान, चंद्र आणि चमकदार चांदण्या म्हणजे आपले व्यावहारिक / प्रापंचिक ज्ञान. म्हणजेच आत्मज्ञानाच्या प्रकाशात या नश्वर जगताचा आभास तसेच आणि व्यावहारिक / प्रापंचिक ज्ञान देखील मावळून जाते असे अभिप्रेत आहे. त्यावेळी अर्जुनाचे मन संकल्प विकल्प विरहित झाले अर्थात त्याचे ध्यान लागले. त्याची बुद्धी स्वतःला अवरेनाशी झाली, इंद्रिये अंतर्मुख होऊन हृदय आत्मानुभवाच्या सुखाने भरून गेले. त्यावेळी स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त व्हावी आणि एकाग्रतेला एकाग्रता प्राप्त व्हावी अशी स्थिती निर्माण झाली. अर्जुनाच्या विचारांना मोहिनी पडली व तो आत्मसुखामध्ये रमून गेला.
The selected verses from Vibhuti Yoga chapter of Bhagavad Gita are illustrating the condition of Arjuna! He was stunned by witnessing the infinite cosmic form of Lord Krishna. Just as in the bright light of the sun, the moon and the stars become invisible, similarly, the whole world vanished in the presence of the infinite cosmic form of Lord Krishna. His mind ceased to function, his senses were withdrawn into his heart. He remained unmoved in deep silence as though his thoughts were struck by a weapon.
▶ Facebook - / geet.dnyaneshwari
Concept, Original Compositions & Music, Singing
Dr. Dinesh Katre and Paritosh Katre
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
गीत ज्ञानेश्वरी : नादचित्रांची रुपडी
संकल्पना * संगीत * गायन
डॉ. दिनेश कात्रे आणि परितोष कात्रे
Contact: [email protected]
Copyright 2022 © All Rights Reserved
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
#Dnyaneshwari #GeetDnyaneshwari #DnyaneshwarAbhanga #MarathiClassicalSongs #RaagKhamaj #IndianClassicalMusic #IndianFusionMusic #MarathiNewSongs #HindustaniClassical #MarathiFusionMusic #BhavarthaDeepika #BhavarathMauli #Jnaneshwari #Alandi #MarathiMusic #DnyaneshwarMauli #MauliDnyaneshwar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: