Russian Women In Karnataka Cave: 2017 मध्येच व्हिसा एक्स्पायर, तरी Nina Kutina भारतात कशी राहिली ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-07-12
Просмотров: 274499
#BolBhidu #RussianWoman #GokarnaCave
कर्नाटकच्या गोकर्णमधलं रामतीर्थ हिल्स, तशी निसर्गरम्य जागा. पण इथं यायचा मार्ग सहजसोपा नाही, इथं फारसं घनदाट नसलं तरी जंगल आहे, विषारी प्राण्यांचा वावर आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं भूस्खलनाचा मोठा धोका आहे. बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजे जुलै २०२४ मध्ये इथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालं होतं, मागच्या काही दिवसांपासून सुद्धा इथं अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळं पोलिसांनी खबरदारी म्हणून गस्त घालायला सुरुवात केली. अशाच एका नॉर्मल पेट्रोलिंग दरम्यान पोलिस पोहोचले एका गुहेजवळ. डोंगरात असलेल्या या गुहेच्या बाहेर कपडे वाळत घातलेले दिसलेले.
त्या गुहेत कुणीतरी राहत होतं, पोलिसांनी नेमकं काय घडतंय हे तपासण्यासाठी त्या गुहेत प्रवेश केला आणि त्यानंतर पोलिसांना दिसलेलं दृश्य हादरवून टाकणारं होतं. या गुहेत एक रशियन महिला राहत होती, तिच्यासोबत दोन लहानग्या मुली सुद्धा होत्या. गुहेच्या आजूबाजूला सापांचा वावर असण्याची,जंगलात हिंस्त्र श्वापदं असण्याची पूर्ण शक्यता होती, पण तरीही ही महिला इथं राहत होती, तेही आपल्या मुलींसोबत. पण ही रशियन महिला या गुहेत आली कशी आणि कशासाठी ? या गुहेत पोलिसांना नेमकं काय सापडलं ? आणि रशियन महिलेमुळे कुठले प्रश्न उपस्थित झाले आहेत ? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओमधून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: