शनिवार स्पेशल मिसळ पाव, आज होती कारभाऱ्यांना सुट्टी मग काय काहीतरी वेगळं झालंच पाहिजे
Автор: Aryan Life Style
Загружено: 2025-12-14
Просмотров: 122
नमस्कार मंडळी मिसळ साठी लागणारे साहित्य
200 ग्रॅम मोड आलेली मटकी
बारीक चिरलेले दोन-चार कांदे, टोमॅटो, लसुन पाकळ्या चार-पाच
आले, कोथंबीर, सुकं खोबरे लिंबू व फरसाणा ताजे ब्रेड
सिक्रेट मसाला
तीळ, मगज बी, शेंगदाणे व थोडी फुटाणे डाग एका वाटीत पाण्यामध्ये भिजत घालावी या मसाल्याने आपली मिसळ खूप छान होते आणि चवीलाही अप्रतिम होते एकदा नक्की ट्राय करा व कमेंट मध्ये मलाही सांगा तुम्हाला रेसिपी आवडली की नाही चला तर मग कृती पाहू
प्रथम एका पातेल्यामध्ये एक लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवून देऊ, त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ हळद व थोडा हिंग घालून घ्यावा त्याच मोड आलेली मटकी घालून घेऊ साईटला आपली मटकी तन उकळत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ
मसाला मध्ये सुके खोबरे मगज बीज भिजत घातलेले आहे तो मसाला कच्चाच एक-दोन टोमॅटो, कांदे कोथंबीर लसणाच्या चार ते पाच पाकळ्या आले व थोडी कोथिंबीर घेऊन पेस्ट करून घेऊ मसाला आपला तयार होत आहे तोपर्यंतच आपण इकडे जी मटकीचा स्टॉक उकळत घातला होता तेही उकळलेले आहे बघा उकळते पाणी एका पातेल्यामध्ये काढून घेऊ व मटकी ही साईटला काढून घेऊ
त्याच पातेल्यामध्ये आता आपण मिसळ फोडणी देऊ
मिसळला तरी येण्यासाठी थोडे तेल जास्त वापरावे लागते
तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्येच मोहरी व कडीपत्ता घालून घेऊ तयार केलेला मसाला घालून घेऊ त्याच्यामध्ये चवीपुरते लाल तिखट काश्मिरी लाल तिखट घालून घेऊ त्याच्यामध्येच चवीपुरता एक दोन चमचे सांबर मसाला घालून घ्यावा त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते मसाला छान शिजवून घेऊ तेल सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत मसाला शिजला की त्याच्या मध्ये जे मटकीचा स्टॉक काढला होता तो घालून घेऊ वरून कोथिंबीर घालून तयार आहे आपली मिसळ चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: