गहू पिकातील तांबेरा, खोडमाशी, मावा आणि करपा रोग नियंत्रण
Автор: BharatAgri Marathi
Загружено: 2022-12-28
Просмотров: 33526
▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/
============================================================
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱भारतअॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱गहू - तांबेरा, खोडमाशी, मावा आणि करपा रोग नियंत्रण👍
गहू पिकावर अनेक किडीं येत असल्या तरी आपल्या विभागात या पिकावर मुख्यतः खोडकिडी, मावा इ. व पानावरील व खोडावरील तांबेरा, करपा इ. रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो त्याच्या नियंत्रणासाठी खाली दिलेल्या उपाययोजना कराव्यात.
1️⃣मावा -
गव्हाचे पिकावर दोन प्रकारचे मावा दिसुन येतो. एकाचा रंग पिवळसर तर दुस-याचा रंग हिरवा असतो. हे किटक लांब व वर्तुळाकार असते.
किडीचे पिल्ले व प्रौढ मावा पानातुन व कोवळ्या शेंड्यातुन रस शोषन करतात. तसेच आपल्या शरीरातुन मधासाखा गोड व चिकट पदार्थ सोडतात. व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते.
➡️प्रतिबंधात्मक नियंत्रण -
पिवळे चिकट सापळे १३ आणि निळे चिकट सापळे १२ प्रति एकरी लावावेत.
जैविक उपायांमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम ॲनिसोप्ली प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
➡️रासायनिक उपाय -
अरेवा (थायामिथोक्झाम २५ डब्ल्यूजी) 8 ग्रॅम
धनप्रीत (ॲसिटामिप्रीड) ८ ग्रॅम
कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड १७.८ एस.एल ) - ८ मिली
प्रति १५ लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
2️⃣खोडमाशी -
➡️लक्षणे -
उशिरा पेरणी झालेल्या गव्हामध्ये किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो.
ढगाळ हवामान किडीस पोषक असते. किडीची अळी दवबिंदूतील ओलाव्याच्या मदतीने पोंग्यात शिरून गाभा खाते. त्यामुळे रोपमर तसेच फुटवे मर दिसून येते.
पूर्ण वाढ झालेली अळी ८ ते १० मिमि लांब असून पिवळसर रंगाची असते. मृत पोंगा ओढल्यास तळाशी खोडमाशीची अळी दिसून येते.
➡️रासायनिक उपाय:
पोंगेमर किंवा फुटवे मर दिसून आल्यास
धानुलक्स (क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही) ३० मिलि
सुपर डी (क्लोरोपायरीफॉस + सायपरमिथ्रीन) - ३० मिली
प्रति १५ लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
3️⃣पानावरील करपा -
➡️लक्षणे -
रोगाची लक्षणे प्रामुख्याने कोरडवाहू पेक्षा बागायती गव्हावर जास्त प्रमाणात येतो.
रोगाचे प्रमाण जास्त वाढल्यास करप्याचे ठिपके एकत्र मिसळून संपूर्ण पान करपते.
१९ ते २० सेल्सियस तापमान, सतत दमट हवामान असल्यास या रोगाचा प्रसार होतो.
➡️प्रतिबंधात्मक:
संशोधन केंद्राच्या शिफारशीप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. गहू पिकाला जास्त पाणी दिल्यास पिकात ओलावा सतत टिकून राहतो. वाढलेल्या आर्द्रतेमुळे रोगाचे प्रमाण वाढते.
शिफारशीत रासायनिक खत मात्रेचा वापर करावा. युरियाचा वापर शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात केल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
➡️रासायनिक उपाय:
सिक्सर - (कार्बेन्डाजिम 12% + मॅंकोझेब 63% डब्ल्यूपी) ३० ग्राम
कॉन्टाफ प्लस - (हेक्साकोनाजोल का 5% एससी) १५ मिली
अवतार (झिनेब ६८% + हेक्साकोनॅझोल ४% डब्ल्यू) - ३० ग्राम
प्रति १५ लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: